मराठी बातम्या /बातम्या /मनी /

रिटायरमेंट आधी किती वेळा काढता येतात PF चे पैसे? पाहा काय आहे EPFO चा नियम

रिटायरमेंट आधी किती वेळा काढता येतात PF चे पैसे? पाहा काय आहे EPFO चा नियम

नोकरी (Job) करत असताना आपण आपल्या गरजा मिळणाऱ्या वेतनातून (Salary) भागवत असतो. नोकरीच्या कालावधीत जमवलेली पुंजी हाच आपला सेवानिवृत्तीनंतरच्या (Retirement) जीवनाचा आधार असतो. नोकरी करत असताना दरमहा आपल्या वेतनातून विशिष्ट रक्कम पीएफ (PF) अर्थात प्रॉव्हिडंट फंडासाठी कापली जाते.

नोकरी (Job) करत असताना आपण आपल्या गरजा मिळणाऱ्या वेतनातून (Salary) भागवत असतो. नोकरीच्या कालावधीत जमवलेली पुंजी हाच आपला सेवानिवृत्तीनंतरच्या (Retirement) जीवनाचा आधार असतो. नोकरी करत असताना दरमहा आपल्या वेतनातून विशिष्ट रक्कम पीएफ (PF) अर्थात प्रॉव्हिडंट फंडासाठी कापली जाते.

नोकरी (Job) करत असताना आपण आपल्या गरजा मिळणाऱ्या वेतनातून (Salary) भागवत असतो. नोकरीच्या कालावधीत जमवलेली पुंजी हाच आपला सेवानिवृत्तीनंतरच्या (Retirement) जीवनाचा आधार असतो. नोकरी करत असताना दरमहा आपल्या वेतनातून विशिष्ट रक्कम पीएफ (PF) अर्थात प्रॉव्हिडंट फंडासाठी कापली जाते.

पुढे वाचा ...

मुंबई, 24 एप्रिल : नोकरी (Job) करत असताना आपण आपल्या गरजा मिळणाऱ्या वेतनातून (Salary) भागवत असतो. नोकरीच्या कालावधीत जमवलेली पुंजी हाच आपला सेवानिवृत्तीनंतरच्या (Retirement) जीवनाचा आधार असतो. नोकरी करत असताना दरमहा आपल्या वेतनातून विशिष्ट रक्कम पीएफ (PF) अर्थात प्रॉव्हिडंट फंडासाठी कापली जाते. `पीएफ`च्या माध्यमातून मिळणारी रक्कम ही सेवानिवृ्त्तीनंतरच्या जीवनासाठी उपयुक्त ठरणारी असते. गेल्या काही वर्षांत `ईपीएफओ`नं (EPFO) पीएफ संदर्भातले काही नियम बदलले आहेत. यानुसार, तुम्हाला सेवानिवृत्तीपूर्वी अनेक वेळा `पीएफ`च्या खात्यातून ठराविक रक्कम काढता येऊ शकते. परंतु, ही रक्कम काढण्यासाठी ठोस कारण देणं आवश्यक असतं. `ईपीएफओ`नं `पीएफ`मधून रक्कम काढण्यासाठी काही नियम निश्चित केले आहेत.

तुमची कंपनी `पीएफ`मधला त्यांचा वाटा आणि तुमचा वाटा अकाउंटमध्ये जमा करते. `ईपीएफओ`च्या वेबसाइटवर जाऊन ही रक्कम तुम्हाला ऑनलाइन पाहता येते. याचाच अर्थ पासबुकमध्ये कंपनी आणि तुमचा वाटा नेमका किती हे पाहता येतं. नोकरी करत असतानाच आपण अ‍ॅडव्हान्स पीएफ (Advance PF) काढू शकतो, ही बाब सर्वश्रुत आहे. प्रॉव्हिडंट फंडातली रक्कम आपल्या भविष्यकाळासाठी केलेली तजवीज असते. त्यामुळे कायद्यानुसार ही रक्कम सेवानिवृत्तीपर्यंत न काढणं हितावह असतं. परंतु, काही वेळा अचानक एखादी समस्या आपल्या जीवनात निर्माण होते. अशा वेळी आपल्याला पैसा उपलब्ध होण्याकरिता आगाऊ पैसे काढण्याचा म्हणजेच अ‍ॅडव्हान्स पीएफचा नियम सरकारनं केला आहे. यासाठी तुम्हाला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ सर्वतोपरी मदत करते. त्यासाठी तुम्हाला ठोस कारण द्यावं लागतं. त्यानंतर आगाऊ पैसे काढण्याची प्रक्रिया करता येते.

नोकरी गेल्यावर हातात पैसे नसणं, मुला-मुलींचं लग्न, उच्च शिक्षण, स्वमालकीचं घर घेण्यासाठी, घर बांधण्याकरिता, जमीन खरेदीसाठी तुम्ही पीएफमधून आगाऊ रक्कम काढू शकता. त्याप्रमाणे तुम्ही गरजेनुसार, तुमच्या मुलाच्या अथवा मुलीच्या इयत्ता 10वीनंतरच्या शिक्षणासाठी पीएफ अकाउंटमधून तीन वेळा पैसे काढू शकता. घरबांधणीसाठी, तसंच घरासाठी जमीन खरेदी करण्याकरिता तुम्ही केवळ एकदाच `पीएफ`मधून आगाऊ रक्कम काढू शकता. सेवानिवृ्त्तीपूर्वी तुम्ही वैद्यकीय कारणासाठी (Medical Reason) कितीही वेळा `पीएफ`मधून रक्कम काढू शकता. तुमच्या मुलाचं अथवा मुलीचं लग्न असेल, तर तुम्ही पीएफ अकाउंटमधून फक्त तीन वेळा आगाऊ रक्कम काढू शकता. रक्कम काढण्यासाठी कोणतंही बंधन नसले तरी करविषयक (Tax) नियमदेखील लक्षात घेणं आवश्यक आहे.

तुम्ही सलग पाच वर्षांच्या सेवेपूर्वी `पीएफ`चे पैसे काढल्यास 10 टक्के दराने टीडीएस (TDS) कापला जाईल. पैसे काढताना पॅन क्रमांक दिल्यास हा दर असतो. पॅन क्रमांक दिला नाही तर 30 टक्के दराने टीडीएस कापला जातो. पाच वर्षं सलग नोकरी केल्यानंतर पीएफमधून पैसे काढले, तर त्यावर कोणताही कर अर्थात टॅक्स आकारला जात नाही. तसंच एखाद्या कर्मचाऱ्याने आपले पीएफचे पैसे नॅशनल पेन्शन स्कीममध्ये ट्रान्सफर केले तर त्याला कोणत्याही प्रकारचा कर द्यावा लागत नाही.

`ईपीएफओ`च्या नियमानुसार, पीएफ अकाउंटमधून आगाऊ रक्कम काढण्यासाठी तुम्ही जे कारण देता, त्यावरून तुम्हाला किती पैसे मिळणार हे निश्चित केलं जातं. नोकरी नसल्याने सलग दोन महिने पगार मिळाला नसल्याचं कारण असेल तर तुम्ही पीएफच्या खात्यावर जमा असलेली सर्व रक्कम काढू शकता. दुसरं कारण म्हणजे नैसर्गिक आपत्ती. यामध्ये तुम्हाला पीएफमध्ये एकूण जमा असलेल्या रकमेपैकी 75 टक्के अधिक व्याज मिळेल किंवा तीन महिन्यांचा पगार आणि डीए या दोन्हींपैकी जे कमी असेल ते मिळेल. हाच नियम कोविड-19 च्या कालावधीत `पीएफ`मधून आगाऊ रक्कम काढण्यासाठी होता. कोविड-19च्या (Covid -19) कारणासाठी केवळ एकदाच `पीएफ`मधून आगाऊ रक्कम काढू शकता.

मग प्रश्न असा आहे, की तुम्ही सेवानिवृत्तीपूर्वी किती वेळा पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी अर्ज करू शकता आणि तुम्हाला किती वेळा पैसे मिळू शकतात. ईपीएफओच्या नियमानुसार पीएफ खात्यातून निवृत्तीपूर्वी अनेक वेळा पैसे काढता येतात; पण त्यासाठी ठोस कारण देणं आवश्यक असतं, हा त्याचा मथितार्थ

First published:

Tags: Epfo news, Pf