नवी दिल्ली, 27 डिसेंबर : सरकारी असो वा खासगी कर्मचारी ग्रॅच्युइटी कायद्यांतर्गत सर्वांना ठराविक कालावधीपर्यंत एकाच संस्थेत किंवा कंपनीमध्ये काम केल्यानंतर ग्रॅच्युइटी सुविधेचा लाभ मिळतो. जेव्हा एखादा कर्मचारी सलग पाच वर्षं एखाद्या कंपनीसोबत काम करतो, तेव्हा त्याला ग्रॅच्युइटीच्या ठरलेल्या सूत्रानुसार त्याची रक्कम दिली जाते. तो कर्मचारी सेवानिवृत्त होत असेल वा त्याने नोकरीचा राजीनामा दिला असेल तरीही त्याला मात्र ग्रॅच्युइटी नक्कीच दिली जाते. आता प्रश्न हा उरतो की, नोकरी सोडल्यानंतर वा राजीनामा दिल्यानंतर किती दिवसानंतर तुम्ही ग्रॅच्युइटीसाठी दावा करु शकता. जर खूप कालावधी झाल्यानंतर तुम्ही दावा केलात तर तुमची कंपनी ग्रॅच्युइटीचे पैसे देण्यास नकार देवू शकते का, याची दावा करण्याची प्रक्रिया काय आहे व किती दिवसांनंतर आपले पैसे खात्यात जमा होतात. या संदर्भात काही तज्ज्ञांशी संवाद साधल्यानंतर खूप महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हेही वाचा : हा आहे नवा बिझनेस! 10 हजारात करा सुरुवात, कमी भांडवलात भरपूर नफा! अर्ज कधीपर्यंत करायचा ? गुंतवणूक सल्लागार स्विटी मनोज जैन यांच्या म्हणण्यानुसार, ग्रॅच्युइटी कायदा, 1972 नुसार कोणत्याही कंपनीला कर्मचाऱ्याने काम सोडल्यानंतर वा राजीनामा दिल्यानंतर 30 दिवसांच्या आत ग्रॅच्युइटीची रक्कम देणं आवश्यक आहे. स्वाभाविक आहे की, कर्मचाऱ्यांनेही 30 दिवसांच्या आत ग्रॅच्युइटीसाठी अर्ज करणं आवश्यक आहे. जर कर्मचारी स्वतः अर्ज करू शकत नसेल तर त्याने अधिकृत केलेल्या व्यक्तीमार्फत 30 दिवसांच्या आत अर्ज करु शकतो. जर 30 दिवसानंतर अर्ज केला तर तसं तर ग्रॅच्युइटीसाठी अर्ज करण्याचा कालावधी हा 30 दिवसांचा निश्चित केलेला आहे. पण कालावधीनंतरही जरी कर्मचाऱ्याने ग्रॅच्युइटीसाठी अर्ज केला असेल तर कंपनी तो अर्ज नाकारू शकत नाही. मात्र, नोकरी सोडल्यानंतर वा राजीनामा दिल्यानंतर किती दिवसांनी तुम्ही अर्ज करू शकता, याबाबत कोणतेही निश्चित असे निकष नाहीयेत, पण अर्ज अंतिम मुदतीनंतर आला असल्याचं सांगून कंपनी कधीही तुमचा अर्ज नाकारू शकत नाही. हेही वाचा : गुडन्यूज! ‘या’ मोठ्या बँकेनं वाढवला FDवरील व्याजदर, वाचा संपूर्ण डिटेल्स ग्रॅच्युइटी दावा करण्याची प्रक्रिया - नोकरी सोडल्यानंतर वा राजीनामा दिल्यानंतर 30 दिवसांच्या आत कर्मचाऱ्याला फॉर्म ‘I’ भरावा लागेल. - जर कर्मचार्याने आपला नॉमिनी म्हणून दुसर्या कोणाची नियुक्ती केली असेल किंवा अधिकृत केली असेल, तर त्याला फॉर्म ‘J’ भरावा लागेल आणि तो कंपनीला द्यावा लागेल. - अर्ज मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत, तुमची कंपनी त्यावर उत्तर देईल. - जर नियमांनुसार अर्ज योग्य असेल आणि तुमची ग्रॅच्युइटी झाली असेल, तर कंपनी संपूर्ण रकमेचा तपशील फॉर्म ‘L’ मध्ये भरेल. - कंपनी तुम्हाला एक निश्चित तारीखदेखील सांगेल, ज्यामध्ये तुम्हाला ग्रॅच्युइटी दिली जाईल. ही वेळमर्यादा तुमच्या अर्जापासून 30 दिवसांच्या आत असावी. अशा प्रकारे ग्रॅच्युइटीचा दावा आपण करू शकतो. त्याबाबत भीती बाळगण्याचं काही कारण नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.