कोरोना व्हायरस महासाथीच्या काळात गुगलच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. गुगलने घरुन काम करण्याचा अवधी वाढवून पुढील वर्षापर्यंत केला आहे. म्हणजे 2021 जुलैपर्यंत कर्मचारी वर्क फ्रॉम होम करू शकतील.
टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी गुगलने सोमवारी याबाबत माहिती दिली. सांगितले की त्याचे कर्मचारी 2021 जुलैपर्यंत घरुन काम करू शकतील
गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेट इंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना एक इमेल पाठवला. यामध्ये लिहिले आहे की – कर्मचाऱ्यांना पुढील प्लानिंग करण्यासाठी आम्ही वैश्विक स्तरावर वर्क फ्रॉम होमची सुविधा 30 जून 2021 पर्यंत वाढवत आहे.
एका अमेरिकेतील मीडियाने सांगितले की सुंदर पिचाई यांनी हा निर्णय काही वरिष्ठांशी चर्चा करून घेतला आहे. या निर्णयामुळे संपूर्ण जगभरातील गुगलच्या 2 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना फायदा होईल. गुगलनंतर तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्या वर्क फ्रॉमचा अवधी वाढवू शकतील.