नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी : देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक HCL Technologies च्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद येईल अशी बातमी आली आहे. HCL टेक आपल्या कर्मचाऱ्यांना तब्बल 700 कोटींहून अधिक स्पेशल बोनस (Special Bonus) देणार आहे. HCL टेककडून जारी केलेल्या वक्तव्यानुसार फेब्रुवारी 2021 मध्ये कर्मचाऱ्यांना स्पेशल बोनस देण्यात येणार आहे.
किती असेल बोनस
HCL टेकने स्पेशल बोनसची घोषणा 2020 मध्ये 10 अरब डॉलरचा फायदा झाल्याच्या आनंदात केली होती. कंपनीने सांगितलं की, जगभरातील कर्मचाऱ्यांना वन टाइम स्पेशल बोनस (One Time Special Bonus) देणार आहे. यावर तब्बल 700 कोटी रुपयांचा खर्च होईल. HCL टेककडून जारी केलेल्या वक्तव्यानुसार ज्या कर्मचाऱ्यांना नोकरीत एक वर्षे वा त्याहून अधिक झालं असून त्यांना हा बोनस देण्यात येईल. हा बोनस कर्मचाऱ्यांच्या 10 दिवसांच्या सॅलरीइतका असेल.
हे ही वाचा- 150 रुपये भरा आणि LIC विम्यातून मिळवा 19 लाख रुपये! मुलांसाठी ठरेल फायदेशीर
फेब्रुवारीच्या सॅलरीसह येणार बोनस
IPO आणल्याच्या तब्बल 20 वर्षांच्या आता HCL टेक 20 अरब डॉलर उत्पन्न मिळवणारी कंपनी ठरली आहे. कंपनीने या यशमागे कर्मचारी, नेटवर्क पार्टनर्स आणि स्टेकहोल्डर्ससह कंपनीचे लॉन्ग टर्म सहकाऱ्यांना दिला आहे. कर्मचाऱ्यांना हा स्पेशल बोनस फेब्रवारी 2021 च्या पगारात दिला जाणार आहे.
HCL टेकचा मोठा फायदा
HCL टेकचा तिसऱ्या तिमाहीतील वाढ 31 टक्क्यांपर्यंत वाढली होती. तिसऱ्या तिमाहीत कंपनीचं नेट प्रॉफिट वाढून 3982 कोटी रुपये झालं आहे. डिजिटल प्रो़क्ट आणि प्लॅटफॉर्म सेगमेंटच्या व्यापारात वाढ झाल्याने कंपनीला हा जबरदस्त फायदा झाला आहे. HCL Technologies चे चीफ HR ऑफिसर अप्पाराव वीवी म्हणाले की, आमचे कर्मचारी आमची सर्वात मोठी संपत्ती आहे. महासाथीदरम्यानही HCL कंपनीच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य याच्या वाढीसाठी काम करीत होता. 10 अरब डॉलरचा हा माइलस्टोन 159000 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचा परिणाम आहे. आम्ही या पाठिंब्यासाठी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाचे आभार व्यक्त करतो.
HCL 20 हजार नवीन भरती करणार
बोनस व्यतिरिक्त कंपनी मोठ्या प्रमाणात हायरिंगची योजना राबवित आहे. येत्या 6 महिन्यात कंपनी 20000 लोकांना रुजू करुन घेणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Viral news