मुंबई, 20 जून : भारतीय सराफा बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price) आज घट झाली आहे. 24 कॅरेटचे 10 ग्रॅम सोने 51064 रुपयांना विकले जात आहे, तर 999 शुद्धतेची एक किलो चांदी आज 61067 रुपयांना मिळत आहे. ibjarates.com नुसार, 23 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव आज 50860 रुपयांवर गेला आहे. 22 कॅरेट शुद्धतेचे सोने 46775 रुपयांना विकले जात आहे. 18 कॅरेट शुद्धतेचे सोने 38298 रुपयांना मिळत आहे. तर 14 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 29872 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आला आहे. Edible Oil Prices: महागाईत सर्वसामान्यांना दिलासा! खाद्यतेलाच्या किमतीत कपात सोन्या-चांदीच्या किमती किती कमी झाल्या? सोन्या-चांदीच्या दरात आज किंचित घसरण झाली आहे. 24 कॅरेट शुद्धतेचे दहा ग्रॅम सोने आज 105 रुपयांनी स्वस्त झाले आहे, तर 23 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा दर 104 रुपयांनी कमी झाला आहे. 22 कॅरेट शुद्धतेचे सोने मागील दिवसाच्या तुलनेत 96 रुपयांनी कमी दराने विकले जात आहे. 18 कॅरेट शुद्धतेचे सोने 79 रुपयांनी स्वस्त होत आहे. 14 कॅरेट शुद्धतेचे सोने 62 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर एक किलो चांदीचा भाव आज 509 रुपयांनी खाली आला आहे. सोन्याचे दर फोनवर मिळवा IBJA सरकारी सुट्टी वगळता शनिवार आणि रविवारी दर जारी करत नाही. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल देऊन सोन्याची किरकोळ किंमत जाणून घेऊ शकता. तुम्हाला एसएमएसद्वारे लेटेस्ट दरांची माहिती मिळेल. सरकारच्या SGB स्कीमद्वारे आजपासून स्वस्त सोनं खरेदीची संधी, गुंतवणूक कशी करावी? सोन्याची शुद्धता कशी तपासणार? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. ‘BIS Care App’ द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.