मुंबई: ऐन लग्नसराईच्या दिवसात सोन्याला मोठी मागणी वाढली आहे. याच दरम्यान सोनं खरेदी करणं आता आवाक्याबाहेर जातं की काय अशी भीती वाढत आहे. सोन्याचे दर आता 55 हजारांच्या जवळपास पोहोचले आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत 55 हजार पार होतील अशी भीती आहे. वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. जागतिक बाजारात आज चांदीच्या दरात मोठी वाढ झाली 24 डॉलर प्रति औंस दराने व्यापार करत आहे. बुधवार, 21 डिसेंबर रोजी भारतीय वायदे बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) आज सुरुवातीच्या सत्रात सोन्याचे दर 0.05 टक्क्यांनी वाढले. वायदे बाजारात चांदीच्या भावाने कालच्या बंद किंमतीपेक्षा आज 0.12 टक्क्यांची उसळी घेतली आहे. MCX वर सोन्याचा दर 1.08 टक्क्यांनी तर चांदीचा दर 3.14 टक्क्यांनी वधारला.
शेअर बाजारात पैसे लावणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमीबुधवारी वायदे बाजारात 10 ग्रॅम सोन्याचे दर 54,923 रुपये आहेत. तर चांदीचे दर 69,630 रुपये दिसत आहेत. सोन्याच्या दरात सतत बदल होत आहेत. जिल्ह्यानुसार कसे आहेत सोन्याचे दर जाणून घेऊया. नाशिक सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
---|---|---|
24 कॅरेट | 5,414 | 54,140 |
22 कॅरेट | 4,963 | 49,630 |
20 कॅरेट | ||
18 कॅरेट |
मुंबईतील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
---|---|---|
24 कॅरेट | 5411 | 54110 |
22 कॅरेट | 4960 | 49600 |
20 कॅरेट | 4594 | 45940 |
18 कॅरेट | 3940 | 39400 |
मुंबईतील चांदीचे दर - 69500 वर्धा शहरातील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
---|---|---|
24 कॅरेट | 5,355 | 53,550 |
22 कॅरेट | 5,116 | 51,160 |
20 कॅरेट | 4,625 | 46,250 |
18 कॅरेट | 4,575 | 45, 750 |
वर्धा शहरातील सोन्याचे दर- 65530
Social Media : फोन किंवा सोशल मीडियावर खासगी माहिती शेअर करताय, हे वाचून बसेल धक्कानागपूर शहरातील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
---|---|---|
24 कॅरेट | 5,450 | 54,500 |
22 कॅरेट | 5,180 | 51,800 |
20 कॅरेट | 4,920 | 49,250 |
18 कॅरेट | 4,360 | 43, 600 |
नागपूर शहरातील चांदीचे दर प्रतिकिलो - 67,000 सोलापुरातील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
---|---|---|
24 कॅरेट | ५३८० | ५३८०० |
22 कॅरेट | ४९४० | ४९४०० |
20 कॅरेट | ४६४३ | ४६४३५ |
18 कॅरेट | ४०४४ | ४०४४४ |
सोलापुरातील चांदीचे दर- ६९७७४
औरंगाबाद शहरातील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
---|---|---|
24 कॅरेट | 5,490 | 54900 |
22 कॅरेट | 5,050 | 50500 |
20 कॅरेट | -——- | -——- |
18 कॅरेट | -——- | ——– |
इथे दिलेले दर हे GST आणि मेकिंग चार्जेस वगळून देण्यात आले आहेत. त्यामुळे दुकानात तुम्ही दागिने घेण्यासाठी जात असाल तर या दरावर GST आणि मेकिंग चार्जेस लागू शकतात.