जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Gold Price Today: लग्नसराईत सोन्याच्या दरात आजही उसळी, चेक करा एक तोळे सोन्याची किंमत

Gold Price Today: लग्नसराईत सोन्याच्या दरात आजही उसळी, चेक करा एक तोळे सोन्याची किंमत

Gold Price Today: लग्नसराईत सोन्याच्या दरात आजही उसळी, चेक करा एक तोळे सोन्याची किंमत

Gold Price Today: सोन्याच्या धर्तीवर आजच्या व्यवहारात चांदीच्या दरातही तेजी दिसून येत आहे. मल्टीकमोडिटी एक्सचेंजमध्ये सकाळी चांदीचा भाव 181 रुपयांनी वाढून 61,107 रुपये प्रति किलो झाला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 मे : सध्या लग्नसराईचा मोसम असल्याने अनेकजण सोन्याच्या दरांवर (Gold Price Today) लक्ष ठेवत आहेत. जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे आज देशांतर्गत सराफा बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात (Gold-Silver Rates) उसळी पाहायला मिळाली. लग्नसराईच्या काळात मागणी वाढल्याने सोन्याचा भाव पुन्हा 50 हजारांच्या पुढे गेला आहे, तर चांदीचा दर 61 हजारांच्या आसपास आहे. मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, मंगळवारी सकाळी 24 कॅरेट शुद्धतेची फ्युचर्स किंमत 157 रुपयांनी वाढून 50,405 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. सकाळी एक्स्चेंजमध्ये 50,399 च्या दराने व्यवहार सुरू झाला आणि लवकरच मागणी वाढल्याने ते 0.31 टक्क्यांनी वाढून 50,405 रुपयांवर पोहोचले. याआधी सोन्याच्या भावात सातत्याने घसरण होत होती, त्यावेळी सोन्याचे भाव 50 हजारांच्या खाली आले होते. LIC च्या निराशाजनक लिस्टिंगने गुंतवणूकदार चिंतीत, शेअर विकावे की होल्ड करावे? वाचा तज्ज्ञांना सल्ला चांदी देखील चमकली सोन्याच्या धर्तीवर आजच्या व्यवहारात चांदीच्या दरातही तेजी दिसून येत आहे. मल्टीकमोडिटी एक्सचेंजमध्ये सकाळी चांदीचा भाव 181 रुपयांनी वाढून 61,107 रुपये प्रति किलो झाला. सकाळी वाढीसह चांदीनेही 60,985 वर व्यापार सुरू केला, परंतु वाढती मागणी आणि वापरामुळे काही वेळातच त्यात 0.30 टक्क्यांची उसळी दिसून आली आणि चांदीच्या भावाने 61 हजारांचा टप्पा पार केला. ICICI बँकेकडून पुन्हा एकदा FD व्याजदरात वाढ; 20 बेसिक पॉईंटपर्यंत वाढ, तुम्हाला कसा होईल फायदा जागतिक बाजारपेठेत मंदीचे सावट जागतिक बाजारपेठेत सोन्या-चांदीची चमक कमी होत आहे. आजच्या व्यवहारातही दोन्ही धातूंचे बाजार नरमच राहिले. यूएस मार्केटमध्ये सोन्याचा भाव 1,825.24 डॉलर प्रति औंस या स्पॉट किमतीवर विकला जात आहे आणि तो 0.09 टक्क्यांनी घसरला आहे. त्याचप्रमाणे, चांदीची स्पॉट किंमत देखील 21.61 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत होती, जी कालच्या बंदपासून सपाट व्यवहार करत आहे. गेल्या महिन्यात चांदीची किंमत 27 डॉलर प्रति औंसच्या जवळ पोहोचली होती. तज्ज्ञांच्या मते, यूएस फेड रिझर्व्हने व्याजदरात वाढ केल्यानंतर बाजारावरही दबाव वाढला आहे. अमेरिका, युरोपसह जगभरातील शेअर बाजार अजूनही दबावाखाली असून गुंतवणूकदारांनाही आपले पैसे बुडण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत हे सुरक्षित ठिकाण मानून लोक पुन्हा सोन्याकडे वळत आहेत आणि सोन्याची खरेदी वाढवत आहेत. भारतीय सराफा बाजारात लग्नसराईचा हंगाम असल्याने मागणी आहे. त्यामुळेच जागतिक बाजारपेठेत घसरण होऊनही देशांतर्गत बाजारात सोने-चांदी महाग होत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात