मुंबई, 18 एप्रिल : जागतिक बाजारपेठेत भाव वाढल्याने भारतीय बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Rates) वाढ झाली आहे. सोमवारी सकाळी सोन्याच्या दराने (Gold Price Today) महिनाभराचा उच्चांक गाठला. मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सकाळी सोन्याचा फ्युचर्स भाव 0.65 टक्क्यांनी वाढून 53,332 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. 24 कॅरेट शुद्ध सोन्याची ही किंमत आहे. त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही 1 टक्क्यांनी मोठी उसळी दिसून आली आणि चांदी (Silver Price Today) 69,761 रुपये प्रति किलोवर पोहोचली. मे महिन्याच्या व्यवहारानुसार सोन्या-चांदीची फ्युचर्स किंमत निश्चित करण्यात आली आहे. जागतिक बाजारपेठेतही भाव वाढले रशिया-युक्रेन युद्धाचे संकट अधिक गडद होत आहे आणि जागतिक बाजारपेठेवर त्याचा परिणाम पुन्हा दिसू लागला आहे. गुंतवणूकदार पुन्हा एकदा सुरक्षितता म्हणून सोन्याकडे धाव घेत आहेत. जागतिक बाजारात सोन्याची किंमत 0.5 टक्क्यांनी वाढून 1,984.58 डॉलर प्रति औंस झाली आहे. 14 मार्चनंतरचा हा सोन्याचा उच्चांक आहे. चांदीची स्पॉट किंमतही 0.7 टक्क्यांनी वाढून 25.87 डॉलर प्रति औंस झाली. इतर मौल्यवान धातूंमध्ये, प्लॅटिनम 1.2 टक्क्यांनी वाढून 1,001.57 डॉलरवर आणि पॅलेडियम 1.6 टक्क्यांनी वाढून 2,406.85 डॉलरवर पोहोचले. महागाईने सोन्याला झळाळी भारत, अमेरिकेसह जगभरात वाढत्या महागाईमुळे सोन्या-चांदीच्या किमती आणखी वाढू शकतात. तज्ज्ञांचा असा अंदाज आहे की अमेरिकेतील किरकोळ चलनवाढ सध्या 40 वर्षांच्या उच्चांकावर आहे आणि तेथे व्याजदर वाढल्यास सोन्याची किंमत प्रति औंस 2000 डॉलरपर्यंत जाईल. त्याचप्रमाणे, चांदीची किंमत देखील प्रति औंस 27 डॉलरपर्यंत पोहोचू शकते. त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारातील सोन्या-चांदीच्या किमतीवर होणार आहे. Bank Time: आजपासून बँकांच्या कामकाजाच्या वेळेत बदल, ग्राहकांना होईल फायदा कशी तपासाल सोन्याची शुद्धता? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. ‘BIS Care App’ द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. बँक अकाऊंटमध्ये पैसे नसतील तरी वेळप्रसंगी काढता येतील 10,000 रुपये; काय आहे सरकारची सुविधा? मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.