जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Gold-Silver Price : सोनं खरेदी करण्याची योग्य वेळ दवडू नका; आजच्या दरांमध्ये झाली मोठी घट, पाहा रेट

Gold-Silver Price : सोनं खरेदी करण्याची योग्य वेळ दवडू नका; आजच्या दरांमध्ये झाली मोठी घट, पाहा रेट

Gold-Silver Price : सोनं खरेदी करण्याची योग्य वेळ दवडू नका; आजच्या दरांमध्ये झाली मोठी घट, पाहा रेट

आपण सोनं खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर ही चांगली संधी यासाठी आहे. कारण, सोन्याचा दर अद्याप गेल्या वर्षीच्या उच्चांकी दरापेक्षा 9,000 रुपयांनी स्वस्त चालू आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 18 जून : सोनं-चांदी (Gold-Silver Price) खरेदी करण्यासाठी ही योग्य वेळ आहे असं म्हणावं लागेल. कारण गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत सातत्याने घसरण होत आहे. आज शुक्रवारी गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 47,410 रुपयांवरून 47,350 रुपयांवर आली आहे. दुसरीकडं, चांदीबद्दल बोलायचेे झाल्यास चांदीचा दर कमी होऊन 70,300 रुपये प्रतिकिलोवर आला आहे. शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याच्या किंमती प्रति 10 ग्रॅम 60 रुपयांनी घसरून 48,350 रुपयांवर आल्या आहेत. मागील व्यापार सत्रात हे दर 48,410 रुपये होते. सोन्याची किंमत 9,000 रुपयांनी स्वस्त  आपण सोनं खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर ही चांगली संधी यासाठी आहे. कारण, सोन्याचा दर अद्याप गेल्या वर्षीच्या उच्चांकी दरापेक्षा 9,000 रुपयांनी स्वस्त चालू आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये (2020) सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 56,000 रुपयांच्या वर गेली होती. त्या तुलनेत आजचा दर हा 48,350 रुपये आहे. सोन्याचा दर (Gold Price आज, 18 जून) गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार राजधानी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम 47,000 रुपये आहेत. चेन्नईमध्ये दरात चांगली घसरण झाली असून हे दर 45,150 रुपयांवर आले आहेत. मुंबईतील 10 ग्रॅम सोन्याचा दर 47,350 रुपये आहे. कोलकातामध्ये प्रति 10 ग्रॅम 47,180 रुपये दर सुरू आहे. चांदीच्या दरात मोठी घसरण आज चांदीच्या किंमतीत प्रचंड घसरण झाली आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार शुक्रवारी चांदी 2600 रुपयांनी स्वस्त झाली. दिल्लीत 1 किलो चांदीची किंमत 67,700 आहे. तर मुंबई, कोलकाता, चेन्नईमध्ये हे दर अनुक्रमे, 67,7००, 67,7०० आणि 74, 4०० रुपये आहेत. हे वाचा -  तृणमूलच्या खासदाराच्या कानशिलात लगावणाऱ्या व्यक्तीचा संदिग्ध मृत्यू; राजकीय वर्तुळात खळबळ अशी तपासा शुद्धता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’ द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे आपण सोन्याची शुद्धता तपासण्यासह त्यासंदर्भात कोणतीही तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये, वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्याबद्दल त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅप (गोल्ड) च्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात