मुंबई, 19 सप्टेंबर : भारतीय सराफा बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर जाहीर झाले आहेत. ताज्या दरांवर नजर टाकली तर सोन्याचे भाव खाली आले आहेत. दहा ग्रॅम सोने आज 49328 रुपयांना विकले जात आहे, तर 999 शुद्धतेचे एक किलो चांदीचे दर 55144 रुपयांवर पोहोचले आहेत. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा दर 49328 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. त्याच वेळी, शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी तो 49341 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला. अशा प्रकारे आज सोन्याचा दर 13 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या घसरणीसह उघडला आहे. सोन्याचे दर उच्चांकी किमतीपेक्षा स्वस्तच मात्र यानंतरही सोने आजही त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 6872 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. चांदीच्या दरात वाढ आज चांदीचा दर 56350 रुपये प्रति किलोवर खुला आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी 55144 प्रति किलोच्या दराने बंद झाली होती. अशा प्रकारे आज चांदीचा दर 1206 रुपये प्रति किलोच्या वाढीसह उघडला आहे. सोन्याची शुद्धता अशा प्रकारे तपासा सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे अनेक बनावट दागिनेही बाजारात मिळू लागले आहेत. अशा परिस्थितीत, आयएसओ (Indian Standard Organization) लोकांना खोटे दागिने ओळखण्यासाठी हॉलमार्क तपासण्याचा सल्ला देते. 18 कॅरेटवर 750, 21 कॅरेटवर 875, 23 कॅरेटवर 958 आणि 24 कॅरेट सोन्यावर 999 लिहिले आहे. तुमच्या शहरातील सोन्याचे दर असे तपासा तुम्हाला तुमच्या शहरातील सोन्याची किंमत जाणून घ्यायची असेल तर तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल करू शकता. काही वेळानंतर तुम्हाला एसएमएसद्वारे नवीन दर मिळतील. याशिवाय तुम्ही www.ibja.co किंवा ibjarates.com या वेबसाइटवरही नवीन दर तपासू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.