मुंबई, 23 जून : सोने-चांदीच्या दरात आजही घसरण पाहायला मिळाली. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा दर 50994 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर काल शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी तो 51155 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला. अशा प्रकारे आज सोन्याचा दर 161 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या घसरणीसह उघडला आहे. सोने आजही 5,206 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त विकले जात आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. आज चांदीचा दर 60409 रुपये प्रति किलोवर आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदीचा दर 60,744 प्रति किलोच्या दराने बंद झाला होता. अशा प्रकारे आज चांदीचा दर प्रतिकिलो 335 रुपयांच्या घसरणीसह उघडला आहे. PPF खात्यातून मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढता येतात, किती होईल नुकसान? चेक करा प्रोसेस MCX वर सोन्याचे दर? मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने घसरणीसह व्यवहार करत आहे. ऑगस्ट 2022 मध्ये, सोन्याचा फ्युचर्स ट्रेड 110.00 रुपयांच्या घसरणीसह 50,794.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. दुसरीकडे, चांदीचा जुलै 2022 फ्युचर्स ट्रेड 390.00 रुपयांनी घसरून 60,258.00 रुपयांच्या पातळीवर आहे. LIC Saral Pension Yojna : फक्त एकदा पैसे भरा आणि दरमहा घ्या 12 हजार रूपये पेन्शन सोन्याचे दर फोनवर मिळवा IBJA सरकारी सुट्टी वगळता शनिवार आणि रविवारी दर जारी करत नाही. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल देऊन सोन्याची किरकोळ किंमत जाणून घेऊ शकता. तुम्हाला एसएमएसद्वारे लेटेस्ट दरांची माहिती मिळेल. सोन्याची शुद्धता कशी तपासणार? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. ‘BIS Care App’ द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.