जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Gold price : सोनं 65 हजारांवर जाणार, आताच घ्याल तर फायद्यात राहाल

Gold price : सोनं 65 हजारांवर जाणार, आताच घ्याल तर फायद्यात राहाल

Gold price : सोनं 65 हजारांवर जाणार, आताच घ्याल तर फायद्यात राहाल

दिवाळीपर्यंत सोनं 65 ते 68 हजार रुपयांवर जाईल असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. त्यामुळे तुम्ही जर आता सोनं घेतलं तर तुम्ही फायद्यामध्ये राहाल.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

अभिषेक जायसवाल, प्रतिनिधी वाराणसी : जागतिक बाजारपेठेतील स्थिती सध्या म्हणावी तेवढी चांगली नाही. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोक सोन्याकडे वळत आहेत. सोन्याची मागणी देखील वाढली आहे. दुसरीकडे प्रत्येक दिवशी सोनं वाढतच चाललं आहे. सोन्याने नवीन रेकॉर्ड केला आहे. याच दरम्यान तुम्ही जर दर वाढतात म्हणून सोनं घेत नसाल तर अशी चूक करू नका. कारण अक्षय्य तृतीया आणि त्यानंतर सोनं आणखी वाढण्याची शक्यता आहे. दिवाळीपर्यंत सोनं 65 ते 68 हजार रुपयांवर जाईल असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. त्यामुळे तुम्ही जर आता सोनं घेतलं तर तुम्ही फायद्यामध्ये राहाल.

सोनं घालण्याची हौस आहे ना? पण ते वापरण्याचे योग्य नियम तुम्हाला माहितीय का?
News18लोकमत
News18लोकमत

भारतात सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मार्चनंतर एप्रिल महिन्यात सोने दररोज नवनवीन विक्रम करत आहे. 6 एप्रिल रोजी सराफा बाजारात सोन्याचा भाव 61 हजारांच्या पुढे गेला होता. दुसरीकडे, जर आपण एमसीएक्स मार्केटमध्ये सोन्याच्या किंमती 60 हजारांच्या वर गेल्या आहेत. मार्चनंतर एप्रिल महिन्यात सोन्याचे भाव ज्या प्रकारे गगनाला भिडत आहेत, ते पाहता धनत्रयोदशी आणि दीपावलीपर्यंत सोन्याचा भाव ६५ हजारांच्या पुढे जाऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. वाराणसी बुलियन असोसिएशनचे संरक्षक आणि घाऊक सराफा व्यापारी विजय तिवारी म्हणाले की, येत्या आठवड्यात सोने आपले सर्व जुने रेकॉर्ड मोडू शकते. MCX वर सोन्याची किंमत ६२६०० चा जुना विक्रम मोडेल असा अंदाज आहे.

दिवाळीपर्यंत ही किंमत ६५ हजारांच्या जवळपास पोहोचू शकते. अशा स्थितीत त्याची किंमत स्थानिक बाजारात ६६५०० ते ६७५०० पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

शेअर मार्केटपेक्षा सोन्यामध्ये पैसे गुंतवलेल्यांना मोठा फायदा, पाहा नेमकं कसं?

प्रोफेसर अनूप मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या सुरुवातीस सोन्याच्या किमतीत वाढ होण्याबरोबरच लग्नसराईचा हंगामही कारणीभूत आहे. याशिवाय अक्षय्य तृतीयेमुळे त्याची मागणीही वाढते. त्यामुळे सोन्याच्या किमतीत किंचित वाढ होताना दिसत आहे.बाजारातील गेल्या काही वर्षांचा ट्रेंडही असाच काहीसा संकेत देत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात