जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / 1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम जाणून घ्या

1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम जाणून घ्या

घरगुती वापराच्या गोष्टी, घरगुती गॅस सिलिंडर, इंश्युरन्स, विदेशात पैसे पाठवण्यासाठी आकारला जाणारा कर अशा आणि यासारख्या अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

01
News18 Lokmat

Changes From 01st October 2020 : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच नवीन बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम आपल्या जीवनशैलीवर किंवा दैनंदिन खर्चावर पडू शकतो. घरगुती वापराच्या गोष्टी, घरगुती गॅस सिलिंडर, इंश्युरन्स, विदेशात पैसे पाठवण्यासाठी आकारला जाणारा कर अशा आणि यासारख्या अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. जाणून घेऊया कोणकोणते नियम बदलणार आणि नवीन लागू होणार आहेत.

जाहिरात
02
News18 Lokmat

मोहरीच्या तेलासंदर्भात नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. FSSAI च्या नव्या नियमानुसार 1 ऑक्टोबरपासून मोहरीच्या तेलाची इतर तेलात भेसळ करण्यावर बंदी आली आहे. यासंदर्भात कठोर नियमावली जाहीर करण्यात आली असून असे भेसळयुक्त तेल आढळल्यास कारवाई केली जाणार आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

मिठाईच्या दुकानांमध्ये मिळणाऱ्या पदार्थांमध्ये चांगली क्वालिटी देण्याबाबत काही नियम कठोर कऱण्यात आले आहेत. मिठाईची एक्सपायरी डेट सांगणं अत्यावश्यक आहे. याची संपूर्ण माहिती FSSAI कडे देणं अनिवार्य असणार आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

1 ऑक्टोबरपासून वाहतुकीसंदर्भातील महत्त्वाची कागदपत्र ही ऑनलाइन वेब पोर्टलद्वारे अपडेट करणं गरजेचं असणार आहे. लायसन्स, डॉक्युमेंटेशन, फिटनेस सर्टिफिकेट याशिवाय आणखीन लागणाऱ्या इतर कागदपत्रांचा यामध्ये समावेश असणार आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

तुमचं कोणी नातेवाई किंवा मुलगा विदेशात असेल तर आता त्याला पैसे पाठवण्यासाठी तुम्हाला कर भरावा लागणार आहे. याआधी हा कर आकारण्यात येत नव्हता मात्र 1 ऑक्टोबरपासून कर आकारण्यात येणार आहे. 2.5 लाख डॉलर्स वर्षाला तुम्ही पाठवू शकता यावर कोणताही कर आकारला जाणार नाही मात्र त्यापेक्षा जास्त पैसे पाठवायचे असल्यास 5 टक्के टॅक्स आकारण्यात येणार आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

विमा नियामक आयआरडीएआयच्या नियमांनुसार आरोग्य विमा पॉलिसीमध्ये एक मोठा बदल होणार आहे. 1 ऑक्टोबरपासून सर्व आधीचे आणि नवीन आरोग्य विमा पॉलिसीअंतर्गत जास्त रोगांचा सामावेश केला जाणार आहे. याचाच अर्थ असा की वेगवेगळ्या रोगांसाठी एकाच पॉलिसीतून पैसे वापरता येऊ शकतात. हे बदल आरोग्य विमा पॉलिसी प्रमाणित आणि ग्राहक केंद्रित करण्यासाठी केले जात आहेत. यात इतरही अनेक बदलांचा समावेश आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

अनलॉक 5 च्या नव्या गाइडलाइन्स आल्यानंतर घरगुती सिलिंडरचे दर कमी होतील अशी अपेक्षा आहे. सप्टेंबर महिन्यात सिलिंडरची किंमत कमी करण्यात आली होती ऑक्टोबरला देखील गृहिणींना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम जाणून घ्या

    Changes From 01st October 2020 : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच नवीन बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम आपल्या जीवनशैलीवर किंवा दैनंदिन खर्चावर पडू शकतो. घरगुती वापराच्या गोष्टी, घरगुती गॅस सिलिंडर, इंश्युरन्स, विदेशात पैसे पाठवण्यासाठी आकारला जाणारा कर अशा आणि यासारख्या अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. जाणून घेऊया कोणकोणते नियम बदलणार आणि नवीन लागू होणार आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम जाणून घ्या

    मोहरीच्या तेलासंदर्भात नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. FSSAI च्या नव्या नियमानुसार 1 ऑक्टोबरपासून मोहरीच्या तेलाची इतर तेलात भेसळ करण्यावर बंदी आली आहे. यासंदर्भात कठोर नियमावली जाहीर करण्यात आली असून असे भेसळयुक्त तेल आढळल्यास कारवाई केली जाणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम जाणून घ्या

    मिठाईच्या दुकानांमध्ये मिळणाऱ्या पदार्थांमध्ये चांगली क्वालिटी देण्याबाबत काही नियम कठोर कऱण्यात आले आहेत. मिठाईची एक्सपायरी डेट सांगणं अत्यावश्यक आहे. याची संपूर्ण माहिती FSSAI कडे देणं अनिवार्य असणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम जाणून घ्या

    1 ऑक्टोबरपासून वाहतुकीसंदर्भातील महत्त्वाची कागदपत्र ही ऑनलाइन वेब पोर्टलद्वारे अपडेट करणं गरजेचं असणार आहे. लायसन्स, डॉक्युमेंटेशन, फिटनेस सर्टिफिकेट याशिवाय आणखीन लागणाऱ्या इतर कागदपत्रांचा यामध्ये समावेश असणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम जाणून घ्या

    तुमचं कोणी नातेवाई किंवा मुलगा विदेशात असेल तर आता त्याला पैसे पाठवण्यासाठी तुम्हाला कर भरावा लागणार आहे. याआधी हा कर आकारण्यात येत नव्हता मात्र 1 ऑक्टोबरपासून कर आकारण्यात येणार आहे. 2.5 लाख डॉलर्स वर्षाला तुम्ही पाठवू शकता यावर कोणताही कर आकारला जाणार नाही मात्र त्यापेक्षा जास्त पैसे पाठवायचे असल्यास 5 टक्के टॅक्स आकारण्यात येणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम जाणून घ्या

    विमा नियामक आयआरडीएआयच्या नियमांनुसार आरोग्य विमा पॉलिसीमध्ये एक मोठा बदल होणार आहे. 1 ऑक्टोबरपासून सर्व आधीचे आणि नवीन आरोग्य विमा पॉलिसीअंतर्गत जास्त रोगांचा सामावेश केला जाणार आहे. याचाच अर्थ असा की वेगवेगळ्या रोगांसाठी एकाच पॉलिसीतून पैसे वापरता येऊ शकतात. हे बदल आरोग्य विमा पॉलिसी प्रमाणित आणि ग्राहक केंद्रित करण्यासाठी केले जात आहेत. यात इतरही अनेक बदलांचा समावेश आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 07