जाहिरात
मराठी बातम्या / मनी / महिलेच्या खात्यातून काढले तब्बल 40 लाख अन् उडवले जुगारात, Bank Manager ने केलं मोठं कांड

महिलेच्या खात्यातून काढले तब्बल 40 लाख अन् उडवले जुगारात, Bank Manager ने केलं मोठं कांड

अटक करण्यात आलेला आरोपी

अटक करण्यात आलेला आरोपी

एका बँक कर्मचाऱ्याने धक्कादायक कृत्य केले.

  • -MIN READ Local18 Dehradun,Uttarakhand
  • Last Updated :

हिना आजमी, प्रतिनिधी देहरादून, 5 मे : एक सामान्य माणूस आपल्या कष्टाचे पैसे बँकेत साठवून ठेवतो, जेणेकरून गरज पडल्यास भविष्यात त्याचा वापर करता येईल. मात्र, उत्तराखंडच्या डेहराडूनमधून एका बँक कर्मचाऱ्याने ग्राहकांचे कष्टाचे पैसे काढून ते जुगारात खर्च केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर बँक कर्मचाऱ्यावर 40 लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्या पैशातून ऑनलाइन जुगार खेळून लाखो रुपयांचे नुकसान केले. त्याचबरोबर आरोपीला अटक करून कारागृहात पाठवण्यात आले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण -  मिळालेल्या माहितीनुसार, डेहराडून येथील युनियन बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत असलेल्या आरोपी निशांत सडाना याने त्याच्याच बँकेतील एका महिला ग्राहकाला टार्गेट केले. त्याने महिलेच्या खात्यातून एफडीचे 40 लाख रुपये पत्नी आणि इतर खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. युनियन बँकेचे शाखा व्यवस्थापक (महानगरपालिका डेहराडून) यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात माहिती देताना सांगितले की, निशांत सडाना हा याच शाखेत 2015 ते 2021 या कालावधीत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता.

News18लोकमत
News18लोकमत

त्याचवेळी निशांतने आपल्या पदाचा गैरवापर करत बँकेच्या एका महिला ग्राहकाच्या खात्यातून 40 लाख रुपये ट्रान्सफर करून तीन पत्ती जुगारात लावले. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास येताच पोलिसांनी तपास सुरू केला आणि निशांत सडानाविरुद्ध पुरावेही सापडले. यानंतर डेहराडून पोलिसांनी त्याला नैनिताल जिल्ह्यातील हल्दवानी येथून अटक केली. डेहराडून शहर एसपी सरिता डोबल यांनी सांगितले की, 2021 मध्ये युनियन बँक ऑफ इंडियाच्या महानगरपालिका शाखेतील एका महिलेच्या एफडी खात्यातून 40 लाख रुपये काढण्यात आले. बँकेने तपास केला असता निशांत सडानाने हे पैसे काढल्याचे समोर आले. बँकेने दबाव आणल्यानंतर त्याने साडेसात लाख रुपये बँकेला परत केले. यानंतर बँकेने निशांतची बदली करून त्याला निलंबित केले. सध्या तो हल्दवणी शाखेत संलग्न होता. सरिता डोबाल यांनी सांगितले की, निशांतविरुद्ध 25 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला आता अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. निशांतने चौकशीदरम्यान सांगितले की, त्याला ऑनलाइन कॅसिनो गेम खेळण्याचे व्यसन होते. यामुळे त्याचे सर्व पैसे संपले. त्याला महिला ग्राहकाच्या मुदत ठेवीची माहिती होती. त्याने एफडीमधून 40 लाख रुपये काढून पत्नी आणि नातेवाईकांच्या खात्यात ट्रान्सफर केले. यानंतर तीन पत्तीच्या खेळात सर्वाधिक पैसा उडाला. या घटनेने मोठी खळबळ उडाली असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात