IIT खडकपूरच्या विद्यार्थ्याने अवघ्या 15 महिन्यात कमवले 5000 कोटी; असा केला कारनामा

IIT खडकपूरच्या विद्यार्थ्याने अवघ्या 15 महिन्यात कमवले 5000 कोटी; असा केला कारनामा

आयआयटीचा (IIT kharagpur ) एक माजी विद्यार्थी फक्त पंधरा महिन्यांमध्ये जवळपास पाच हजार कोटी रुपयांचा मालक झालाय. फ्लिपकार्ट आणि गुगलसारख्या दिग्गज कंपन्यांमध्ये काम काम केलेल्या या व्यक्तीचे नाव सुरोजित चॅटर्जी असे आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 एप्रिल: आयआयटी खडकपूरचा (IIT Kharagpur) एक माजी विद्यार्थी फक्त पंधरा महिन्यांमध्ये जवळपास पाच हजार कोटी रुपयांचा मालक झालाय. फ्लिपकार्ट (Flipkart) आणि गुगलसारख्या (Google) दिग्गज कंपन्यांमध्ये काम काम केलेल्या या व्यक्तीचे नाव सुरोजित चॅटर्जी (IIT Student Surojit Chatterjee )असे आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये अमेरिकेतील सर्वात मोठ्या क्रिप्टो करेंसी (cryptocurrency) एक्सचेंज कॉइनबेसमध्ये चीप प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून त्यांनी काम सुरू केले होते. कॉइन बेस्टमध्ये पंधरा महिन्यांमध्ये त्यांनी जवळपास 180.8 मिलियन डॉलरची कमाई केली. भारतीय रुपयामध्ये हे जवळपास पंधराशे कोटी रुपये होतात.

बुधवारी कॉइन बेस्ट एक्सचेंजवर चांगली ट्रेडिंग झाल्यामुळे त्यांच्या कमाईने मोठी झेप घेतली. विशेष म्हणजे येत्या पाच वर्षांमध्ये त्यांच्याकडे शेअरचाही पर्याय उपलब्ध असणार आहे. सध्या कॉइनबेसचा शेअर जवळपास 465.5 मिलियन डॉलर म्हणजे तीन हजार पाचशे कोटी रुपये इतका आहे.

(हे वाचा - शास्त्रज्ञांना मोठं यश! कोरोनासारख्या भविष्यातील महासाथीला रोखण्याचा मार्ग सापडला)

आयआयटी खडकपूरमधून घेतले आहे शिक्षण

सुरोजित चॅटर्जी यांनी आयआयटी खडकपूरमधून बीएससीची पदवी घेतली आहे. मॅक्स डेक बरोबर सुरुवातीनंतर कॉइनबेसचे संस्थापक ब्रायन आर्मस्ट्रॉंग आणि फ्रेड एहरसेम यांच्या सोबत सुरोजित चॅटर्जी यांना चांगलाच फायदा झाला. या तिघांची हिस्सेदारी मिळून 16 अरब डॉलरची झाली आहे. ब्लूमबर्ग बिलेयनेर इंडेक्सवरून ही माहिती मिळाली.

लिस्टिंगनंतर शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे कमाई वाढली

नॅस्डॅक वर 100 अब्ज डॉलर्सच्या मूल्यांकनासह कॉईनबेसचे शेअर्स प्रति शेअर 381 डॉलरच्या दराने सुरू झाले. त्यानंतर तो प्रति शेअर 430 डॉलरपर्यंत वाढला होता. तथापि, नंतर ते 328.28 डॉलरवर बंद झाले. बिटकॉइनबरोबरच ही कंपनी देखील सार्वजनिक झाली आहे. कंपनीच्या ट्रेडिंग व्हॉल्यूममध्ये बिटकॉइन आणि इथरियमचा सर्वाधिक वाटा आहे. ही दोन्ही क्रिप्टोकरन्सी आतापर्यंतच्या उच्च स्तरावर व्यापार करीत आहेत. यावर्षी, बिटकॉइनची किंमत जवळपास दुप्पट झाली असून 64,000 डॉलरच्या जवळपास गेली आहे.

(हे वाचा - IPL 2021: सर्वात महागड्या ख्रिस मॉरीसचा ‘पैसा वसूल’ खेळ, राजस्थानचा पहिला विजय)

मोठ्या कंपन्यांमध्ये काम करण्याचा अनुभव

गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट इंक येथे तीन वर्षे काम केल्यावर चॅटर्जी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात कॉइनबेसमध्ये दाखल झाले. गुगलमध्ये ते कंपनीच्या शॉपिंग प्लॅटफॉर्मवर काम करायचे. यापूर्वी त्यांनी मोबाइलवरील जाहिराती आणि अ‍ॅडसेन्सच्या उत्पादन आणि वितरण कार्यसंघासाठी काम केले होते. त्याला फ्लिपकार्टमध्ये (Flipkart) काम करण्याचा अनुभवही आहे.

Published by: News18 Desk
First published: April 16, 2021, 8:36 AM IST
Tags: AIIMSIIT

ताज्या बातम्या