मुंबई : आरबीआयने रेपो रेट वाढवल्याने एफडीचे दर पुन्हा वाढत आहेत. बहुतांश बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा मिळण्याची ही चांगली संधी असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अनेक वेळा आपत्कालीन परिस्थितीत एफडी पूर्ण होण्यापूर्वी गुंतवणूकदारांना पैसे काढावे लागतात. अशावेळी सांगितलं जातं की तुम्हाला पेनल्टी लावली जाईल. पण खरंच बँका किती पेनल्टी आकारतात का? या पेनल्टीची किंमत किती असते? ती कशी ठरते नियम काय सांगतो सगळं जाणून घेऊया. एफडी ही एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते कारण ती गुंतवणूकदारांना निश्चित परतावा देते. मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढल्यावर मात्र तेवढीच पेनल्टीही बसते. विविध प्रकारच्या एफडीसाठी मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढण्याच्या प्रमुख बँकांच्या नियमांविषयी सांगणार आहोत. त्यामुळे एफडी करण्याआधी हे नियम नक्की समजून घ्या त्यामुळे तुमचा जास्त फायदा होईल.
जनरल इन्शुरन्स आणि लाइफ इन्शुरन्सममध्ये काय फरक, दोन्ही घ्यावे का?बहुतेक एफडी योजनांमध्ये तुम्हाला मुदतपूर्व पैसे काढण्याचा पर्याय दिला जातो. पण त्यासाठी बँका काही दंड आकारतात. साधारणतः हे शुल्क एफडीच्या व्याजदराच्या 0.5 टक्क्यांपासून 3 टक्क्यांपर्यंत असते. जर तुम्ही मॅच्युरिटीपूर्वी एफडीमधून पैसे काढले आणि ते इतरत्र गुंतवले तर काही बँका त्यासाठी कोणताही दंड आकारत नाहीत. बँकेच्या किंवा एनबीएफसीच्या जवळच्या शाखेत जाऊन किंवा त्याच्या मोबाइल अॅप आणि नेट बँकिंगद्वारे तुम्ही मॅच्युरिटीपूर्वी एफडी बंद करू शकता. स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआयने 5 लाख रुपयांपर्यंतच्या एफडीमधून मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढल्यास 0.5 टक्के दंड आकारला जातो. त्याचबरोबर गुंतवणुकीची रक्कम पाच लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास एक टक्का दंड आकारला जातो.
SBI ग्राहकांना दणका! आजपासून या गोष्टीसाठी मोजावे लागणार जास्त पैसेICICI बँक आयसीआयसीआय बँक एका वर्षापेक्षा कमी कालावधीत मॅच्युरिटीपूर्वी पाच कोटी रुपयांपेक्षा कमी एफडी बंद केल्यास 0.5 टक्के दंड आकारते. त्याचबरोबर पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त एफडी असलेले खाते पाच वर्षांनंतर बंद झाले तर बँक 1.5 टक्के दंड आणि पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी एका टक्का दंड आकारते.