नवी दिल्ली, 23 ऑगस्ट : प्रवासादरम्यान हायवेवर लागणारे टोल नेहमीच आपला खर्च वाढवतात. मात्र केंद्रीय मंत्र्यांचा हवाला देणारा एक मेसेज व्हायरल होत आहे. जर प्रवासी 12 तासांत प्रवास करुन परतले तर त्यांना टोल टॅक्स भरावा लागणार नाही, असे मेसेजमध्ये म्हटले आहे. सरकारने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या मेसेजबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, जर तुम्ही तुमच्या प्रवासादरम्यान 12 तासांत परत येऊ शकता, तर तुम्हाला परतीच्या प्रवासासाठी कोणताही टोल टॅक्स भरावा लागणार नाही. व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नावही देण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आदेशानुसार, जर तुम्ही तुमच्या प्रवासादरम्यान 12 तासांत परत येऊ शकता, तर तुम्हाला कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत.
Whatsapp मेसेज चुकून डिलीट झालाय? ‘या’ नव्या फीचरनं करू शकता रिकव्हर
एक सोशल मीडिया पोस्ट में यह फर्जी दावा किया जा रहा है कि केंद्रीय मंत्री @nitin_gadkari के आदेशानुसार अगर आप अपनी यात्रा के दौरान 12 घंटे में वापस आ सकते हैं तो आपको रिटर्न जर्नी का कोई टोल टैक्स नहीं देना होगा #PIBFactCheck
▶️ @MORTHIndia द्वारा यह आदेश जारी नहीं किया गया है pic.twitter.com/2vJGpdrJYB — PIB Fact Check (@PIBFactCheck) August 21, 2022
व्हायरल मेसेज खोटा
भारत सरकारची प्रेस एजन्सी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजेच पीआयबीने या व्हायरल मेसेजची पडताळणी केली. पीआयबीने त्यांच्या फॅक्ट चेकमध्ये हे दावे खोटे असल्याचे म्हटले आहे. पीआयबीने त्यांच्या फॅक्ट चेक अकाउंटवरून ट्विट केले आहे की, एक सोशल मीडिया पोस्ट असा खोटा दावा करत आहे की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आदेशानुसार तुम्ही तुमच्या प्रवासादरम्यान 12 तासांच्या आत परत येऊ शकत असाल तर तुम्हाला परतीच्या प्रवासात कोणताही टोल भरावा लागणार नाही. हा आदेश रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेला नाही.
‘या’ लोकांना मिळतं निळ्या रंगाचं Aadhaar Card, प्रक्रिया आहे खूपच सोपी
व्हायरल बातम्यांबाबत येथे तक्रार करा
सरकारशी संबंधित कोणतीही दिशाभूल करणारी बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही पीआयबी फॅक्ट चेकची मदत देखील घेऊ शकता. PIB FactCheck या व्हॉट्सअॅप क्रमांक 918799711259 वर किंवा pibfactcheck@gmail.com वर मेल करून कोणीही दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचा स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा URL पाठवू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Central government, Money, Toll naka