Home /News /money /

Economic Inequality : देशात आर्थिक विषमता वेगानं वाढतेय; `ऑक्सफॅम`च्या अहवालातून स्पष्ट

Economic Inequality : देशात आर्थिक विषमता वेगानं वाढतेय; `ऑक्सफॅम`च्या अहवालातून स्पष्ट

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची (World Economic Forum) वार्षिक शिखर परिषद (Annual Summit) लवकरच पार पडणार आहे. या परिषदेपूर्वी `ऑक्सफॅम`नं (Oxfam) एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात देशात वाढत चाललेल्या आर्थिक विषमतेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

पुढे वाचा ...
मुंबई, 17 जानेवारी : जगभरात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा (Corona) कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढताच कडक निर्बंध लागू केले जात आहे. भारतातही (India) स्थिती काही निराळी नाही. कोरोनामुळे देशातल्या बहुतांश क्षेत्रांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. कोरोनामुळे अनेकांना नोकऱ्या (Jobs) गमवाव्या लागल्या आहेत. व्यापार क्षेत्राची स्थिती फारशी आश्वासक नाही. या सर्व गोष्टींचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या उत्पन्नावर (Income) झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Second Wave) सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. देशातली आर्थिक विषमता (Economic inequality) वेगानं वाढत आहे. 2021 मध्ये 84 टक्के सर्वसामान्य नागरिकांच्या उत्पन्नात घट झाली असून, दुसरीकडे देशातल्या अब्जाधीशांची (Billionaire) संख्या मात्र वाढल्याचं `ऑक्सफॅम`च्या अहवालात म्हटलं आहे. याबाबतचं वृत्त `आज तक`ने दिलं आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची (World Economic Forum) वार्षिक शिखर परिषद (Annual Summit) लवकरच पार पडणार आहे. या परिषदेपूर्वी `ऑक्सफॅम`नं (Oxfam) एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात देशात वाढत चाललेल्या आर्थिक विषमतेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या ताज्या अहवालानुसार, वर्षभरापूर्वी देशातल्या अब्जाधीशांची संख्या 102 होती; मात्र 2021 मध्ये ही संख्या 142 वर पोहोचली आहे. या कालावधीत 142 अब्जाधीशांची एकूण संपत्ती सुमारे 720 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. देशातल्या 40 टक्के गरीब लोकसंख्येच्या एकूण संपत्तीपेक्षा हे प्रमाण अधिक आहे. तसंच दुसरीकडे 2021 मध्ये 84 टक्के सर्वसामान्य नागरिकांचं उत्पन्न घटल्याचं या अहवालात म्हटलं आहे. चहा, कॉफी प्या आणि बिल Cryptocurrency मध्ये भरा; कुठे सुरु झालीय ही सुविधा? `ऑक्सफॅम इंडिया`चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ बेहर यांनी सांगितलं, की `केवळ भारतातच नाही, तर जगभरात आर्थिक विषमता पाहायला मिळत आहे. वाढलेली आर्थिक विषमता हा कोरोना महामारीचा (Corona Pandemic) सर्वांत वाईट परिणाम म्हणावा लागेल. सध्या अशी परिस्थिती आहे, की आर्थिक विषमतेमुळे दररोज किमान 21 हजार जण आपला जीव गमावत आहेत. याचा अर्थ विषमतेमुळे दर 4 सेकंदांना एका व्यक्तीचा मृत्यू होत आहे. Electric Vehicle संबंधित शेअर तुमचा पोर्टफोलियो चमकवू शकतात, 'या' शेअर्सवर नजर ठेवा `ऑक्सफॅम`च्या `इनइक्वॅलिटी किल्स` या अहवालानुसार, अब्जाधीशांच्या संख्येबाबत भारताची गणना आता पहिल्या तीन देशांमध्ये होत आहे. भारताच्या तुलनेत सर्वाधिक अब्जाधीश सध्या केवळ अमेरिका (America) आणि चीनमध्ये (China) आहेत. फ्रान्स, स्वीडन आणि स्वित्झर्लंड या देशांशी तुलना करता, एकट्या भारतात अब्जाधीशांची संख्या सर्वाधिक आहे. दुसरीकडे, देशातल्या 50 टक्के गरीब नागरिकांचा राष्ट्रीय संपत्तीतला वाटा केवळ 6 टक्के आहे. यावरून भारतात आर्थिक विषमता किती वेगानं वाढतेय हे सिद्ध होतं.
First published:

Tags: Economic crisis, Money

पुढील बातम्या