Home /News /money /

1 जुलैपासून अनेक आर्थिक बदलांची शक्यता, तुमच्या खिशावर कसा होईल परिणाम?

1 जुलैपासून अनेक आर्थिक बदलांची शक्यता, तुमच्या खिशावर कसा होईल परिणाम?

1 जुलैपासून क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) गुंतवणूकदारांचे नुकसान होणार आहे. पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून, सर्व क्रिप्टो व्यवहारांना 1% TDS भरावा लागेल

    मुंबई, 26 जून : नवीन महिना सुरू होण्यास काही दिवस शिल्लक आहेत. दर महिन्याला अनेक नवे आर्थिक बदल लागू होत असतात. हे बदल तुमच्या खिशावर कोणत्या ना कोणत्या मार्गाने नक्कीच परिणाम करू शकतात. म्हणूनच हे बदल जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुम्ही त्यासाठी तयार असाल. गूड रिटर्न्स वेबसाईटने याबाबतचं वृत्त दिलं आहे. पॅन-आधार लिंक (PAN-Aadhar Link) जर 30 जून 2022 रोजी किंवा त्यापूर्वी पॅन आधारशी लिंक केला तर त्यासाठी 500 रुपये आकारले जातील. 1 जुलै 2022 रोजी किंवा त्यानंतर पॅन-आधार लिंक करण्यासाठी 1,000 रुपये शुल्क आकारले जाईल. क्रिप्टोकरन्सीवर टीडीएस 1 जुलैपासून क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) गुंतवणूकदारांचे नुकसान होणार आहे. पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून, सर्व क्रिप्टो व्यवहारांना 1% TDS भरावा लागेल, मग तुम्ही क्रिप्टो नफा किंवा तोट्यामध्ये विकता याचा कोणताही संबंध नाही. क्रिप्टोकरन्सीमधून मिळणाऱ्या उत्पन्नावरही 30 टक्के कर लागू झाला आहे. एसी महाग होईल पुढील महिन्यापासून एअर कंडिशनरही (AC) महाग होणार आहेत. ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी (BEE) ने एअर कंडिशनर्ससाठी ऊर्जा रेटिंगचे नियम बदलले आहेत, जे 1 जुलैपासून लागू होतील. म्हणजेच 1 जुलैपासून 5 स्टार एसीचे रेटिंग थेट 4 स्टारवर जाईल. अशा परिस्थितीत एसीच्या किमती 7-10 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. गॅस सिलेंडर प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला गॅस सिलिंडरच्या किमतीचा आढावा घेतला जातो. यामध्ये वाढ, कपात याशिवाय किंमत स्थिर राहण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे असे होऊ शकते की 1 जुलैला सिलेंडर महाग होईल किंवा तो स्वस्त होऊ शकतो, ज्याची अपेक्षा कमी आहे. पोस्ट ऑफिस योजनांचे व्याजदर पोस्ट ऑफिस योजनांचे नवीन व्याजदर प्रत्येक तिमाहीच्या सुरुवातीला लागू होतात. त्यातही बदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये वाढ, कपात याशिवाय स्थिती कायम राहण्याचीही शक्यता आहे. आता नवीन तिमाही 1 जुलैपासून सुरू होत आहे, ज्यासाठी नवीन दर जारी केले जाऊ शकतात. सध्या, PPF वर 7.10 टक्के, NSC वर 6.8 टक्के, मासिक उत्पन्न योजना खात्यावर 6.6 टक्के, 5 वर्षांच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर 6.8 टक्के, किसान विकास पत्रावर 6.9 टक्के आणि सुकन्या समृद्धी योजनेवर 7.6 टक्के व्याजदर आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Cryptocurrency, Investment, Money, Post office

    पुढील बातम्या