मुंबई, 18 जानेवारी: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत 12 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. आता शेतकरी पीएम किसानच्या 13व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. केंद्र सरकार 13व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधीही टाकू शकते. मात्र, सरकारने ठरवून दिलेल्या चार अटींची पूर्तता करणाऱ्या शेतकऱ्यांनाच या वेळी पैसे दिले जाणार आहेत. शेवटच्या हप्त्यातही या नियमांची पूर्तता केल्यामुळे सुमारे 2 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळाले नाहीत.
केंद्र सरकारनं गेल्या वर्षी 31 मे रोजी 10.45 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता म्हणून 22,552 कोटी रुपये जारी केले होते. मात्र केवळ 8.42 कोटी शेतकऱ्यांना 12 वा हप्ता मिळाला. अशाप्रकारे दोन कोटी शेतकरी या योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित राहिले. ई-केवायसीसह चार अटींची पूर्तता न केल्यामुळे या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी या अटींची पूर्तता केली नाही, त्यांना तेरावा हप्ताही मिळणार नाही. आज आम्ही तुम्हाला या चार अटींबद्दल सांगत आहोत.
जमीन पडताळणी-
पीएम किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांकडे 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असावी. शेतकरी हा जमिनीचा मालक आहे, यासाठी त्याला त्याच्या जमिनीची सातबारा पीएम किसान वेबसाइटवर अपलोड करावी लागेल जेणेकरून लाभार्थी शेतकरी जमिनीचा मालक असल्याचे सिद्ध होईल. कागदपत्रे तपासल्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या जमिनीची प्रत्यक्ष पडताळणीही करणार आहेत.
हेही वाचा: Farmer Loan : इंडियन बँकेची शेतकऱ्यांसाठी खास ऑफर, ऑनलाइन कर्जासह मिळणार 'या' सुविधा
ई-केवायसी-
पीएम किसान योजनेतील फसवणूक टाळण्यासाठी आता ई-केवायसी (पीएम किसान ई-कायसी) करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ई-केवायसी करणे अवघड काम नाही. शेतकरी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जाऊन OTP द्वारे ई-केवायसी करू शकतात किंवा ते कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन हे काम करू शकतात.
बँक खाते आधारशी जोडलेले असणे आवश्यक –
PM किसान योजनेचा 13 वा हप्ता फक्त अशाच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येईल ज्यांची बँक खाती आधारशी लिंक आहेत. खाते आधारशी लिंक केल्याने शेतकऱ्यांची अचूक माहिती सरकारपर्यंत पोहोचते. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानं सरकारी अनुदानाचे पैसेही वेळेवर खात्यात येऊ लागतात.
खाते NPCI शी देखील जोडलेले असावे-
चौथी अट म्हणजे बँक खाते देखील नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) शी जोडलेले असावे. जर तुम्ही पीएम किसानचे हे नियम पूर्ण केले नाहीत तर तुम्हाला 13वा हप्ता मिळणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.