मराठी बातम्या /बातम्या /मनी /'लाइक करा आणि पैसे कमवा'मुळे अनेकांची लाखोंची फसवणूक, मुंबई पोलिसांकडून तिघांना बेड्या

'लाइक करा आणि पैसे कमवा'मुळे अनेकांची लाखोंची फसवणूक, मुंबई पोलिसांकडून तिघांना बेड्या

 पोलिसांनी तीन आरोपींकडून 70,000 रुपये रोख जप्त केले आहेत आणि ते राहत असलेल्या ठिकाणाची झडती घेतली असता 11 डेबिट कार्ड आणि 19 बँक चेकबुक जप्त करण्यात आली आहेत.

पोलिसांनी तीन आरोपींकडून 70,000 रुपये रोख जप्त केले आहेत आणि ते राहत असलेल्या ठिकाणाची झडती घेतली असता 11 डेबिट कार्ड आणि 19 बँक चेकबुक जप्त करण्यात आली आहेत.

पोलिसांनी तीन आरोपींकडून 70,000 रुपये रोख जप्त केले आहेत आणि ते राहत असलेल्या ठिकाणाची झडती घेतली असता 11 डेबिट कार्ड आणि 19 बँक चेकबुक जप्त करण्यात आली आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई : 'लाइक करा आणि पैसे कमवा' या घोटाळ्यातील एका प्रकरणाचा शोध घेत असताना मुंबईतील व्हीपी रोड पोलिसांनी मध्य प्रदेशातील तीन सायबर गुन्हेगारांना ताब्यात घेतलं आहे. ते मास्टरमाइंड्सना अकाउंट्सची माहिती देत होते, ज्याचा वापर सायबर फसवणूक करून पैसे उकळण्यासाठी केला जात होता. पण, अजूनही या प्रकरणातील मुख्य आरोपी सापडलेले नाहीत. संजय सिंह चौहान, रणवीर सिंह शेखावत आणि आयुष राठोड अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

    या सायबर फसवणुकीचा तपास करणार्‍या मुंबई पोलिसांच्या अनेक पोलीस स्टेशन्स आणि सायबर सेल्सना भारतभरातील नागरिकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरणाऱ्या सायबर गुन्हेगारांना अद्याप ताब्यात घेता आलेलं नाही. दरम्यान, पोलिसांनी तीन आरोपींकडून 70,000 रुपये रोख जप्त केले आहेत आणि ते राहत असलेल्या ठिकाणाची झडती घेतली असता 11 डेबिट कार्ड आणि 19 बँक चेकबुक जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, लाखो रुपयांची फसवणूक करण्यासाठी वापरण्यात आलेलं आरोपींचं खातं गोठवण्यासाठी पोलिसांनी बँकेला पत्र लिहिलं आहे.

    "आमच्या टीमने टेक्निकल टूल्सचा वापर करून कठोर प्रयत्न केल्यामुळे आम्ही मध्य प्रदेशातील तीन संशयितांना पकडण्यात यशस्वी झालो आहोत. त्यांनी त्या अकाउंट्सवर फ्रॉडची रक्कम ट्रान्सफर केली होती. या अटकेमुळे त्यांच्या कामाला ब्रेक लागेल. तोपर्यंत आम्ही इतर सीमस्टर्स शोधण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू ठेवणार आहोत,” असं झोन 02 चे डीसीपी अभिनव देशमुख म्हणाले.

    तपास अधिकारी राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यात जाऊन आरोपींना पकडण्यासाठी आणि त्यांना शहरात परत आणण्यासाठी किमान तीन दिवस तिकडे तळ ठोकला होता. "आम्ही 15-20 किलोमीटर चालत गेलो, कारण आमच्याकडे आरोपींचे पिन पॉइंट लोकेशन नव्हते पण स्थानिक पोलिसांच्या मदतीने आम्ही त्यांना पळून जाण्याआधीच पकडण्यात यशस्वी झालो," असं एक अधिकारी म्हणाले.

    नेमकं प्रकरण काय?

    दक्षिण मुंबईतील 40 वर्षीय व्यक्तीने नोकरीच्या शोधात 15 जानेवारी रोजी तिचा बायोडाटा Naukri.com वर पोस्ट केला आणि 18 जानेवारी रोजी तिला अज्ञात नंबरवरून कॉल आला होता. आपण मॅकॅन ग्रुप एशिया पॅसिफिकचे एचआर असल्याचं कॉलरने सांगितलं आणि तिला गुगलवरील काही लिंक्सवर रिव्ह्यू देण्यास सांगितलं. तसेच ती व्हिडिओ लाइक करून आणि रिव्ह्यू देऊन घरबसल्या काम करू शकते, असंही म्हटलं. या प्रक्रियेदरम्यान तिने काही हजार कमावले आणि नंतर 2 लाख 5 हजार रुपयांची फसवणूक झाली.

    या शिवाय, आरोपींवर बेंगळुरूमध्ये असेच गुन्हे दाखल आहेत आणि एक केस मुंबई पूर्व रिजन सायबर सेलमध्येही दाखल आहे, असं प्राथमिक तपासात समोर आलंय. या तिघांच्या अटकेच्या मदतीने आम्ही संपूर्ण घोटाळ्याच्या मास्टरमाईंडचा शोध घेतोय, जो वेगवेगळ्या टेलिग्राम आणि इन्स्टाग्राम अकाउंट्सचा वापर करून लोकांशी संवाद साधतात आणि नंतर त्यांची लाखोंची फसवणूक करतात, असं मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.

    First published:
    top videos