जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Cryptocurrency Update: क्रिप्टोकरन्सी बाजारात घसरण सुरुच; भारतातील लोकप्रिय करन्सीजमध्ये मोठी पडझड

Cryptocurrency Update: क्रिप्टोकरन्सी बाजारात घसरण सुरुच; भारतातील लोकप्रिय करन्सीजमध्ये मोठी पडझड

Cryptocurrency Update: क्रिप्टोकरन्सी बाजारात घसरण सुरुच; भारतातील लोकप्रिय करन्सीजमध्ये मोठी पडझड

सकाळी बिटकॉइन 1.79 टक्के खाली 29,814.25 डॉलरवर व्यापार करत होता, तर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठी करन्सी इथरियमची (Ethereum) किंमत गेल्या 24 तासात 1.56 टक्के घसरून 2,038.47 डॉलरवर पोहोचली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 मे : क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये (Cryptocurrency Market) घसरण सुरूच आहे. काल थोडी उसळी झाली असली तरी आज बुधवारी पुन्हा बाजार घसरला. आज भारतीय वेळेनुसार सकाळी 9:35 पर्यंत, ग्लोबल क्रिप्टो मार्केट कॅप 1.43 टक्क्यांनी घसरून 1.28 डॉलर ट्रिलियनवर आला आहे. सर्व प्रमुख चलनांची घसरण सुरूच आहे. Coinmarketcap मधील डेटानुसार, सकाळी बिटकॉइन 1.79 टक्के खाली 29,814.25 डॉलरवर व्यापार करत होता, तर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठी करन्सी इथरियमची (Ethereum) किंमत गेल्या 24 तासात 1.56 टक्के घसरून 2,038.47 डॉलरवर पोहोचली. जर आपण गेल्या 7 दिवसांबद्दल बोललो तर, दोन्ही क्रिप्टोकरन्सी लाल आहेत. क्रिप्टोकरन्सीजची सद्यस्थिती? » ट्रोन (Tron TRX) - किंमत: 0.07167 डॉलर (+2.02%) » कार्डानो (Cardano – ADA) – किंमत: 0.5598 डॉलर (-1.55%) » बीएनबी (BNB) - किंमत: 300.32 डॉलर (-1.59%) » अॅव्हलॉन्च (Avalache) - किंमत 33.33 डॉलर (-2.29%) » शिबा इनू (Shibu Inu) - किंमत: 0.0000123 डॉलर (-0.80%) » एक्सआरपी (XRP) - किंमत: 0.4284 डॉलर (-1.31%) » डोजकॉईन (Dogecoin- DOGE) - किंमत: 0.08885 डॉलर (-1.05%) » सोलाना (Solana – SOL) – किंमत: 55.13 डॉलर (-0.90%) » पोल्कडॉट (Polkadot – DOT) – किंमत: 10.55 डॉलर (-3.93%) Coinmarketcap नुसार, MetaPay, SafeFloki (SFK), आणि Dogecolony (DOGECO) ही गेल्या 24 तासांतील सर्वाधिक वधारलेले तीन प्रमुख कॉईन्सपैकी होते. गेल्या 24 तासांमध्ये MetaPay मध्ये 1813.97 टक्के वाढ झाली आहे. SafeFloki (SFK) ने 570.28 टक्के वाढ केली आहे. Dogecolony (DOGECO) तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यात 510.07 टक्क्यांनी झेप घेतली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात