जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Online Fraud : ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी सावध राहा, लक्षात ठेवा 'या' गोष्टी, नाहीतर मोठा फटका बसेल

Online Fraud : ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी सावध राहा, लक्षात ठेवा 'या' गोष्टी, नाहीतर मोठा फटका बसेल

Online Fraud : ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी सावध राहा, लक्षात ठेवा 'या' गोष्टी, नाहीतर मोठा फटका बसेल

कधीकधी खूप महागड्या ऑफर किंवा गिफ्ट्सच्या आमिषापोटी काही लोकं फालतू अॅप्स डाउनलोड करतात किंवा नवनवीन वेबसाईट, लिंक्सचा शोध घेत असतात. अनेकदा अनोळखी वेबसाईटवर शॉपिंग केल्यानेही तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 28 मार्च : डिजिटल पेमेंट (Digital Payment) च्या जगात फसवणुकीची नवनवीन प्रकरणं दररोज समोर येत आहेत. सायबर चोर नवनवीन युक्त्या वापरून लोकांना लुटतात. सायबर क्राईमच्या (Cyber Crime) जगात डिजिटल पेमेंटशीनिगडित फसवणुकीच्या जास्त घडताना दिसतात. कधी क्रेडिट कार्ड (Credit Card Limit) च्या नावे तर कधी डेबिट कार्डच्या एक्सपायरी डेटच्या बहाण्याने चोर फसवणूक करत असतात. कधी केवायसी (KYC) करण्याच्या बहाण्याने तर कधी बँकेचं खातं अपडेट करण्याच्या नावावर लोकांना चुना लावला जात आहे. काही दिवसांपूर्वी हरियाणातील पलवलमध्ये एक प्रकरण समोर आलं. ज्यामध्ये एका व्यक्तीला अनोळखी नंबरवरून कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की, त्या माणसाच्या क्रेडिट कार्डची मुदत संपत आहे. ही मुदत वाढवता येऊ शकते आणि खरंच त्या माणसाच्या क्रेडिट कार्डाची मुदच संपत आली होती. मग त्या माणसाने मुदत वाढवण्यासाठी होकार दिला. कॉल करणाऱ्याने सांगितलं की, त्या माणसाच्या फोनवर जो ओटीपी (One Time Password) येईल तो त्याने शेअर करावा. त्या माणसाने कॉल करणाऱ्याच्या सूचनेप्रमाणे सर्व गोष्टी केल्या. आपली फसवणूक होत आहे याची जाणीव होण्यापूर्वी या व्यक्तीचं बँक खातं रिकाम झालं होतं. असे सायबर गुन्हेगार सामान्य माणासांना फसवतात. Uma Exports IPO आजपासून गुंतवणुकीसाठी ओपन; प्राईज बँड, इश्यू साईज, काय करते कंपनी? वाचा सविस्तर नेहमी सतर्क राहा अनेकदा लोक विचार न करता व्हॉट्सअॅप किंवा मेसेजवर आलेल्या कोणत्याही अनोळखी/अज्ञात लिंकवर क्लिक करतात. फेक लिंक्सवर (Fake Links) क्लिक करणं तुम्हाला महागात पडू शकतं. कारण अशा प्रकारच्या कोणत्याही लिंकच्या माध्यमातून तुमची संपूर्ण माहिती फ्रॉड करणाऱ्याला मिळते. कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉलवरील व्यक्तीला तुमचा अकाउंट ओटीपी किंवा पासवर्ड देऊ नका. कधीकधी खूप महागड्या ऑफर किंवा गिफ्ट्सच्या आमिषापोटी काही लोकं फालतू अॅप्स डाउनलोड करतात किंवा नवनवीन वेबसाईट, लिंक्सचा शोध घेत असतात. अनेकदा अनोळखी वेबसाईटवर शॉपिंग केल्यानेही तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. दर महिना 6000 रुपये गुंतवणूक करुन बनाल करोडपती, पाहा कसं आहे Calculation सायबर फसवणुकीच्या प्रकरणासंबंधी आपली तक्रार cybercrime.gov.in या संकेतस्थळावर नोंदवा आणि हेल्पलाईन नंबर 155260 चा वापर करा. मग पुढच्या वेळी तुम्हीही आपल्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसंबंधी कोणताही ऑनलाईन व्यवहार करताना वरील काळजी नक्की घ्या. सायबर क्राईमला आळा घालण्यासाठी तुम्हीही सतर्क राहा. कारण प्रत्येक गुन्ह्यात पोलीस मदतीला धावून येणं शक्य नाही. आपण सतर्क राहिल्यानंतरही फसवणूक झाली तर पोलीस मदतीसाठी कायमच दक्ष असतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात