कोरोनाची झळ आता सामान्यांच्या खिशाला, 'या' 7 गोष्टी महागणार

कोरोनाची झळ आता सामान्यांच्या खिशाला, 'या' 7 गोष्टी महागणार

एकीकडे कोरोनाने दहशत पसरवली असताना आता दुसरीकडे महागाईही वाढण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 मार्च : कोरोनाव्हायरसमुळे (coronavirus) साऱ्या जगात दहशत पसरवली आहे. भारतातही कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी सध्या शाळा, महाविद्यालये, मॉल्स, ऑफिस बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र या सगळ्यातच सर्वसामान्यांना मात्र महागाईचा फटका बसला आहे. कोरोनामुळं याआधीच काही जीवनाश्वक वस्तुंची टंचाई निर्माण झाली आहे, आता या 7 गोष्टी महागणार आहेत.

विमान भाडे महागले

कोरोनामुळे सरकारने पुढील काही दिवस सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्याची घोषणा केली आहे. मात्र असे असले तरी देशांतर्गत उड्डाणांच्या भाड्यात मोठी वाढ झाली आहे. सध्या इतर राज्यांमध्ये काम करणारे किंवा राहणारे लोक आपल्या घरी परतत आहेत. त्याशिवाय विमान उड्डाणांची संख्याही कमी झाल्यामुळं प्रवास भाड्यात वाढ झाली आहे.

सरकारी योजनांमधील व्याजदर कमी होणार

तर, पुढच्या तिमाहीत तुम्हाला पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट, पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत कमी व्याज मिळू शकेल. असे झाल्यास या छोट्या बचत योजनांवर पूर्वीपेक्षा कमी व्याज मिळेल. सर्वसाधारणपणे लोक बचत आणि व्याज आकर्षण लक्षात घेऊन या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा आग्रह धरतात, मात्र कमी व्याजामुळे लोकांचा हिरमोड होऊ शकतो.

दूधाच्या किंमती वाढल्या

दरम्यान, अमूल दुधाच्या किंमतींमध्ये बदल झाला आहे. पूर्वी अमूलचे दूध प्रति लिटर 44 रुपये दराने उपलब्ध होते, ते आता वाढून 45 रुपये प्रति लिटर झाले आहे. तथापि, अमूल कडून दुधाच्या किंमतींच्या किंमतीबद्दल अद्याप कोणतेही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

रेल्वे भाड्यातील सूट रद्द

याशिवाय निवडक प्रकरणांव्यतिरिक्त रेल्वेने भाड्यांमधील सर्व सूट काढून टाकली आहे. रेल्वेचा हा निर्णय 20 मार्चपासून बुक केलेल्या तिकिटांवर लागू आहे. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आलेली सूटही दूर करण्यात आली आहे. परंतु रूग्ण, विद्यार्थी व अपंगांच्या भाड्यातली सवलत कायम राहील.

फोन महागणार

तर, येत्या काही दिवसांत मोबाइल फोन महाग होतील, कारण 1 एप्रिलापासून फोनवरील जेएसटी वाढवण्यात येणार आहे. फोन हे 18 टक्के टॅक्स स्लॅबमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे पूर्वी हे उत्पादन 12% स्लॅबमध्ये होते. हे नवीन दर 1 एप्रिल 2020 पासून लागू होतील.

पेट्रोल आणि डिझेल महागणार

आगामी काळात पेट्रोल आणि डिझेल महाग होऊ शकतात कारण सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ केली आहे. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाची किंमत स्वस्त झाली आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेलवर अधिक सवलत मिळण्याची अपेक्षा होती.

प्लॅटफॉर्म तिकिट दरात वाढ

कोरोनामुळे गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने 6 विभागांच्या स्थानकांसाठी प्लॅटफॉर्म तिकिट दर 10 रुपयांवरून 50 रुपयांपर्यंत वाढविला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी मुंबई, वडोदरा, अहमदाबाद, रतलाम, राजकोट आणि भावनगर विभागातील रेल्वे स्थानकांवर आता 10 ऐवजी 50 रुपयांना प्लॅटफॉर्म तिकिटे केली आहेत. जेणेकरून स्थानकांवर अनावश्यक गर्दी होऊ नये. हा नियम 16 ​मार्चपासून लागू आहे.

First published: March 20, 2020, 3:10 PM IST

ताज्या बातम्या