मराठी बातम्या /बातम्या /मनी /

एकापेक्षा अधिक पीएफ खाती एकत्र करा आणि तुमच्या जमा पैशांवर अधिक व्याज मिळवा, खात्यांचं एकत्रीकरण कसं कराल?

एकापेक्षा अधिक पीएफ खाती एकत्र करा आणि तुमच्या जमा पैशांवर अधिक व्याज मिळवा, खात्यांचं एकत्रीकरण कसं कराल?

 पीएफ खात्यावरील तपशील माहिती करून घ्यायचा असेल तर ईपीएफओकडे नोंदणीकृत असलेल्या 011-22901406 या मोबाइल क्रमांकावर मिस्ड कॉल देणं आवश्यक आहे. ईपीएफओकडून मेसेजद्वारे सर्व माहिती दिली जाते.

पीएफ खात्यावरील तपशील माहिती करून घ्यायचा असेल तर ईपीएफओकडे नोंदणीकृत असलेल्या 011-22901406 या मोबाइल क्रमांकावर मिस्ड कॉल देणं आवश्यक आहे. ईपीएफओकडून मेसेजद्वारे सर्व माहिती दिली जाते.

पीएफ खात्यावरील तपशील माहिती करून घ्यायचा असेल तर ईपीएफओकडे नोंदणीकृत असलेल्या 011-22901406 या मोबाइल क्रमांकावर मिस्ड कॉल देणं आवश्यक आहे. ईपीएफओकडून मेसेजद्वारे सर्व माहिती दिली जाते.

मुंबई, 16 ऑगस्ट : सरकारी कर्मचारी व संघटित क्षेत्रातील खासगी कर्मचाऱ्यांच्या वतीने कंपनीकडून भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) जमा केला जातो. भविष्याच्या सुरक्षेसाठी हक्काची रक्कम म्हणून भविष्य निर्वाह निधीकडं पाहिलं जातं. भविष्य निर्वाह निधीच्या (Employees Provident Fund) खात्यात जमा रकमेवर सरकारच्या वतीनं दिलं जाणारं व्याज लवकरच खात्यात जमा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी नोकरी करताना एकापेक्षा अधिक भविष्य निर्वाह निधीची खाती (Provident Fund Account) तयार झाली असतील तर ती एकत्र करून चांगलं व्याज मिळवण्याची संधी मिळणार आहे. ‘आज तक हिंदी’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

नोकरीची चांगली संधी मिळाली की, कर्मचारी एका कंपनीतून दुसऱ्या ठिकाणी जातात. अशा वेळी एकापेक्षा अधिक पीए खाती तयार होतात. नव्या पीएफ खात्यात जुन्या खात्यातील रक्कम जमा होत नाही. यासाठी पीएफ खातेदारांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (Employees Provident Fund) वेबसाइटवर जाऊन अकाउंट विलीनकरणाचा (Account Merge) पर्याय निवडावा लागतो. त्यानंतर एका खात्यात सर्व रक्कम दिसते.

यूएएन माहिती असणं आवश्यक

तुम्हाला यूएएन (Universal Account Number) नंबर माहिती असेल तरच पीएफशी संबंधित ऑनलाइन सेवांचा फायदा घेता येऊ शकतो. यासोबतच तुम्हाला यूएएन अ‍ॅक्टिव्हेट असणंही गरजेचं असतं. पीएफ खात्यावरील तपशील माहिती करून घ्यायचा असेल तर ईपीएफओकडे नोंदणीकृत असलेल्या 011-22901406 या मोबाइल क्रमांकावर मिस्ड कॉल देणं आवश्यक आहे. ईपीएफओकडून मेसेजद्वारे सर्व माहिती दिली जाते.

पीएफ खात्यात कधी जमा होऊ शकतं व्याज

भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) खात्यात जमा असलेल्या रकमेवर सरकारच्या वतीनं 2021-22 या आर्थिक वर्षात 8.01 टक्के व्याजदर देण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत पीएफवर मिळणाऱ्या रकमेवर व्याजाची रक्कम जमा होऊ शकते. त्यामुळे एकापेक्षा अधिक पीएफ खाती असतील तर ती एकत्र करा. त्यामुळे तुमची विविध खात्यॆतील पीएफची रक्कम एकाच खात्यात दिसेल.

असं करता येईल खात्याचं एकत्रीकरण

प्रत्येक नवीन कंपनीत नोकरीची संधी स्वीकारताना जुन्या यूएएन नंबरवरून नवीन पीएफ खातं सुरू होतं. अशा परिस्थितीत त्या खात्यांचं एकत्रीकरण करण्यासाठी ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटवर जावं लागतं. वेबसाइटवर गेल्यानंतर सर्व्हिसेसमध्ये (Services) जाऊन One Employee-One EPF Account वर क्लिक करावं. यानंतर EPF खातं विलीन करण्यासाठी फॉर्म उघडला जाईल. इथे पीएफ अकाउंट होल्डरमध्ये मोबाइल नंबर टाकावा लागतो. यानंतर यूएएन आणि सध्याचा मेंबर आयडी टाकावा लागतो.

वेबसाइटवर डिक्लेरेशन भरा

ईपीएफओच्या वेबसाइटवर गेल्यानंतर तुम्हाला सर्व आवश्यक माहिती भरावी लागेल. यानंतर खात्री करण्यासाठी (Authentication) नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी पाठवला जाईल. ओटीपी टाकल्यावर तुम्हाला जुनं खातंही दिसू शकतं. त्यानंतर पीएफ खाते क्रमांक टाकावा. ही प्रक्रिया झाल्यावर एक डिक्लेरेशन (Declaration) समोर येईल. त्याचा स्वीकार करून सबमिट करायचं आहे. यानंतर एकत्रीकरणाची विनंती मान्य होईल. व्हेरिफिकेशनच्या काही दिवसांनंतर तुमची पीएफची अनेक खाती एकत्र होतील.

First published:

Tags: Epfo news, PF Amount