मराठी बातम्या /बातम्या /मनी /अरे वा! आता शेतीशिवाय कॉफीचं उत्पन्न; जाणून घ्या या नव्या तंत्राविषयी...

अरे वा! आता शेतीशिवाय कॉफीचं उत्पन्न; जाणून घ्या या नव्या तंत्राविषयी...

प्रयोगशाळेत उत्पादित ही कॉफी लोकांना किती रुचेल हे काळच ठरवेल. परंतु, या संशोधनामुळं कॉफी उत्पादनाचा एक नवा पर्याय नक्कीच उपलब्ध होणार आहे.

प्रयोगशाळेत उत्पादित ही कॉफी लोकांना किती रुचेल हे काळच ठरवेल. परंतु, या संशोधनामुळं कॉफी उत्पादनाचा एक नवा पर्याय नक्कीच उपलब्ध होणार आहे.

प्रयोगशाळेत उत्पादित ही कॉफी लोकांना किती रुचेल हे काळच ठरवेल. परंतु, या संशोधनामुळं कॉफी उत्पादनाचा एक नवा पर्याय नक्कीच उपलब्ध होणार आहे.

  नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर : कॉफी (Coffee) हे सर्वांचं आवडीचं पेय. दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी, मित्रांसोबत निवांत गप्पा मारताना किंवा अगदी कामात व्यस्त असले तरी अनेक लोक कॉफी पिण्यास पसंती देतात. आज हॉटेल्समध्ये कॉफीचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. अर्थात हे सर्वच प्रकार लोकांच्या पसंतीस उतरत आहेत. 6 प्रमुख कॉफी उत्पादक देशांमध्ये भारताचा समावेश होतो. कॉफी हे नगदी पीक (Cash Crops) मानलं जातं. परंतु, कॉफीचं उत्पादन झाडांवर किंवा शेतात न करता एखाद्या प्रयोगशाळेत केलं गेलं तर? तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. मात्र असा प्रयोग फिनलॅंडमधील (Finland) एका वैज्ञानिकानं करून दाखवला आहे. या प्रयोगाची माहिती `टीव्ही नाइन हिंदी`नं दिली आहे.

  तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कॉफीची शेती (Coffee Farming) पर्यावरणावर दुष्परिणाम करणारी असते. संसाधनांचा अभाव आणि इतर आव्हानांवर संशोधन करणाऱ्या फिनीश शास्त्रज्ञांना प्रयोगशाळेत कॉफीचं उत्पादन घेण्यात यश मिळालं आहे. ही कॉफी पर्यावरणास अनुकूल आहे, असं मत या शास्त्रज्ञांचं आहे.

  `हा प्रयोग म्हणून ठीक आहे. पण चवीचं काय`? असा दुसरा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल. मात्र प्रयोगशाळेत (Lab) उत्पादित करण्यात आलेल्या कॉफीची चव ही नैसर्गिक कॉफीसारखीच असते, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. ही कॉफी पिताना कदाचित तुम्हाला त्यात कॉफीचे अनेक प्रकार मिसळल्याचं वाटू शकतं. त्यामुळे व्यावसायिक पातळीवर अधिक संशोधनाची गरज आहे, असं शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं आहे.

  फिनलॅंडमधील शास्त्रज्ञांनी सेल कल्चर (Cell Culture) तंत्राचा वापर करत या कॉफीचं प्रयोगशाळेत उत्पादन घेतलं. `डॉइच वेले`ने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रयोगशाळेत उत्पादित कॉफीची चव (Test) आणि वास (Aroma) हा नेहमीच्या कॉफी सारखाच असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. व्हिटीटी टेक्निकल रिसर्च इन्स्टिट्युटच्या संशोधकांनी सेल कल्चर तंत्राचा वापर करून कॉफी बिन्सची लागवड न करता कॉफी उत्पादित करता येते आणि ही कॉफी पर्यावरणासाठी फारशी नुकसानकारक नसते, असं सांगितलं.

  हे ही वाचा-नोकरी करतानाच सुरू करा हा व्यवसाय, 1 लाखापर्यंत मिळेल नफा; किती कराल गुंतवणूक?

  ``हे तंत्र सेल्स कल्चरवर आधारित आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करत जैविक पध्दतीनं केवळ कृषी उत्पादनंच नाही तर दूध, मांस आदी जनावरांपासून मिळणारी उत्पादनंही तयार करता येणार आहेत. भलेही ही कॉफी लोकांना फारशी रुचणार नाही, परंतु, हे तंत्र कॉफी उत्पादनक्षेत्रात निश्चितच उपयुक्त ठरु शकेल``, असं व्हिटीटीचे संशोधक हाएकी ऐसाला यांनी सांगितलं.

  या संशोधन पथकाचे प्रमुख हायको रिषर यांनी सांगितले की ``ही प्रक्रिया पर्यावरणपूरक आहे. जगभरात कॉफीच्या मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी आहे. अनेक देशांमध्ये जंगलं नष्ट करून कॉफीची शेती केली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रयोगशाळेत कॉफीचं उत्पादन घेतल्यास किटकनाशकं आणि खतांचा वापर कमी होईल``.

  प्रयोगशाळेत उत्पादित ही कॉफी लोकांना किती रुचेल हे काळच ठरवेल. परंतु, या संशोधनामुळं कॉफी उत्पादनाचा एक नवा पर्याय नक्कीच उपलब्ध होणार आहे.

  First published:
  top videos

   Tags: Coffee, Farmer