नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : सणासुदीच्या काळात स्वयंपाकाच्या तेलाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून केंद्र सरकारने कच्च्या खाद्यतेलांवरील (crude edible oils) सीमाशुल्क ( cuts duty ) कमी केलं आहे. पाम, सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या शुल्कातील कपात गुरुवारपासून लागू होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रिफायन्ड आरबीडी पाममेल, सोयाबीन आणि सूर्यफुलावरील शुल्क 17.5 टक्के करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त केंद्राने क्रूड पाम ऑइल (सीपीओ) वरील कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर 20 टक्क्यांवरून 7.5 टक्क्यांवर आणला आहे आणि कच्चे सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल तेल 20 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर आणले आहे.
अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत महसूल विभागाने बुधवारी या संदर्भात दोन अधिसूचना जाहीर केल्या आहेत. सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन (एसईए) च्या मते, सीपीओवर प्रभावी शुल्क 8.25 टक्के (24.75 टक्के आधी) आणि कच्च्या सोयाबीन तेलावर 5.5 टक्के (24.75 टक्के आधी) आणि सूर्यफूल तेलावरही आयात शुल्क आणि कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर कमी करण्यात येणार आहे.
हे वाचा -
64MP कॅमेरासह Realme चा जबरदस्त 5G स्मार्टफोन भारतात लाँच, पाहा काय आहे किंमत आणि फीचर्स
या कपातीमुळे, आरबीडी पामोलिन, रिफायन्ड सोयाबीन तेल आणि रिफायन्ड सूर्यफूल तेल यावर प्रभावी शुल्क 14 ऑक्टोबरपासून 19.25 टक्के (35.75 टक्के आधी) असेल, अशी माहिती देण्यात आली आहे.
ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या माहितीनुसार, मोहरीचे तेल वगळता खाद्यतेलांच्या किरकोळ किमती 3.26 टक्क्यांवरून 8.58 टक्क्यांवर आल्या आहेत. सरकारने खाद्यतेलाच्या किंमती कमी करण्याच्या उद्देशाने पावले उचलली असली, तरी या तेलांच्या किंमती अजूनही लक्षणीयरित्या कमी झालेल्या नाहीत.
हे वाचा -
अंगावर कोब्रा सोडून पत्नीचा जीव घेणाऱ्याला दुहेरी जन्मठेप, थंड डोक्याने केला होता खून
सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक बी.व्ही.मेहता यांनी सांगितले की, देशांतर्गत बाजारात किरकोळ किंमती वाढल्याने आणि सणासुदीच्या काळात सरकारने खाद्यतेलांवरील आयात शुल्क कमी केले आहे. सरकारने मार्च 2022 पर्यंत पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या कच्च्या वाणांवरी कृषी उपकर कमी केलाय. यामुळे सणासुदीच्या काळात तेलांचे दर कमी व्हावेत यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.