मराठी बातम्या /बातम्या /मनी /सेलिब्रिटींना चुकीची जाहिरात करणे भोवणार? 50 लाखांपर्यंत दंडाची तरतूद; केंद्रीय मंत्रालयाकडून महत्त्वाचे निर्देश

सेलिब्रिटींना चुकीची जाहिरात करणे भोवणार? 50 लाखांपर्यंत दंडाची तरतूद; केंद्रीय मंत्रालयाकडून महत्त्वाचे निर्देश

दुर्दैवाने कॉर्परेट कंपन्या आणि सेलिब्रिटीज पैसे कमावण्याच्या हव्यासामुळे अशा खोट्या जाहिराती (Misleading Advertisements) बनवत आहेत. यामुळे देशातील ग्राहकांच्या हितासाठी अशा गाईडलाईन्सची आवश्यकता होती, असं मत कॅटकडून व्यक्त करण्यात आलं आहे.

दुर्दैवाने कॉर्परेट कंपन्या आणि सेलिब्रिटीज पैसे कमावण्याच्या हव्यासामुळे अशा खोट्या जाहिराती (Misleading Advertisements) बनवत आहेत. यामुळे देशातील ग्राहकांच्या हितासाठी अशा गाईडलाईन्सची आवश्यकता होती, असं मत कॅटकडून व्यक्त करण्यात आलं आहे.

दुर्दैवाने कॉर्परेट कंपन्या आणि सेलिब्रिटीज पैसे कमावण्याच्या हव्यासामुळे अशा खोट्या जाहिराती (Misleading Advertisements) बनवत आहेत. यामुळे देशातील ग्राहकांच्या हितासाठी अशा गाईडलाईन्सची आवश्यकता होती, असं मत कॅटकडून व्यक्त करण्यात आलं आहे.

पुढे वाचा ...

    नवी दिल्ली, 13 जून : ग्राहक व्यवहार मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर बंदी घातली होती. तसंच, सेलिब्रिटींनीदेखील अशा प्रकारच्या जाहिराती करू नयेत याबाबत मार्गदर्शक तत्त्वं जारी केली होती. या निर्णयाबाबत कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनेदेखील (कॅट) समाधान व्यक्त केलं आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमुळे (Deceptive Advertisements) ग्राहकांच्या पसंतीवर चुकीचा परिणाम होतो आहे. दुर्दैवाने कॉर्परेट कंपन्या आणि सेलिब्रिटीज पैसे कमावण्याच्या हव्यासामुळे अशा खोट्या जाहिराती (Misleading Advertisements) बनवत आहेत. यामुळे देशातील ग्राहकांच्या हितासाठी अशा गाईडलाईन्सची आवश्यकता होती, असं मत कॅटकडून व्यक्त करण्यात आलं आहे.

    “उपभोगवादाच्या या युगात, वापरकर्त्यांनी कोणतं उत्पादन खरेदी करावं हे ठरवण्यात जाहिरातींची सर्वांत मोठी भूमिका असते. त्यामुळे जाहिराती या खोट्या नसाव्यात (Fake Advertisements) हे गरजेचं आहे. तसंच, एखाद्या ब्रँडचा प्रसार करणाऱ्या सेलिब्रिटींनीदेखील आपण कोणत्या उत्पादनाची, सेवेची जाहिरात करतो आहोत याबाबत खबरदारी बाळगणं गरजेचं आहे. अशा अनेक जाहिराती आहेत, ज्यांमध्ये सेलिब्रिटी त्या गोष्टी वापरण्यास तर सांगतात, मात्र स्वतः त्यांचा वापर करत नाहीत. आता अशा जाहिराती करणाऱ्या कंपन्यांना 10 ते 50 लाख रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो.” अशी माहिती कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतिया आणि राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी दिली.

    ते पुढे म्हणाले, ‘अशा प्रकारच्या भ्रामक जाहिराती या ग्राहक संरक्षण कायदा, 2019 च्या कलम 2 (28) अंतर्गत गुन्हा ठरतात. मात्र, यापूर्वी भ्रामक जाहिरातींबाबत कोणत्याही प्रकारच्या गाईडलाईन्स (Guidelines for Advertisements) नसल्यामुळे ग्राहकांना फसवणाऱ्या या जाहिरातींकडे कोणीही लक्ष दिलं नव्हतं. एखाद्या उत्पादनाची जाहिरात करणारी सेलिब्रिटीदेखील तेवढीच जबाबदार असते. कारण लाखो लोकांच्या पसंतीवर ते प्रभाव टाकतात. शिवाय ते कंपन्यांकडून जाहिरातीसाठी मोठ्या प्रमाणात पैसाही घेतात. त्यामुळेच कंपनीचा ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर (Brand Ambassador) खोट्या जाहिराती करून आपल्या जबाबदारीपासून हात झटकू शकत नाहीत.’

    मंत्रालयाने सध्या जारी केलेल्या गाईडलाईन्स या ग्राहकांच्या आणि देशाच्या हिताच्या आहेत. यामुळे खोट्या आणि दिशाभूल जाहिराती करणारे सेलिब्रिटीदेखील सावध होतील. कोणत्याही वैध मार्गाने पैसे कमवण्यासाठी देशाचा कायदा कधीही अडवत नाही. मात्र, जर प्रसिद्ध व्यक्ती केवळ पैशांसाठी अशा उत्पादनांची जाहिरात करत असतील, ज्यांचा ते स्वतः वापर करत नाहीत; तर ते चुकीचे आहे. आपलं उत्पादन अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं, अधिकाधिक लोकांनी ते खरेदी करावं यासाठी कंपन्या सेलिब्रिटींचा वापर करतात हे सामान्य आहे. या सेलिब्रिटींच्या लोकप्रियतेचा (Popular Celebrity Advertisements) फायदा आपल्या उत्पादनाच्या विक्रीसाठी व्हावा हा या कंपन्यांचा हेतू असतो. या सेलिब्रिटींनी आपापल्या क्षेत्रात केलेली उल्लेखनीय कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे. मात्र, त्यांनी आपल्या लोकप्रियतेचा वापर करून, लोकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती (Ban on Fake Ads) कराव्यात याचे समर्थन केले जाऊ शकत नाही; असं कॅटने म्हटलंय.

    21व्या शतकात जेवढा टीव्ही आणि सिनेमाचा लोकांवर प्रभाव पडला आहे, तो इतर समाजमाध्यमांच्या तुलनेत कित्येक पटींनी अधिक आहे. लोक आपल्या आवडत्या सेलिब्रिटींचं अनुकरण करतात. त्यामुळे एखाद्या सेलिब्रिटीने एखादं उत्पादन वापरणं योग्य आहे सांगितल्यास लोकही ते वापरतात. त्यामुळेच केवळ पैशांसाठी अशा वस्तूची जाहिरात करणं, जी ती सेलिब्रिटी स्वतः वापरत नाही, वा जिचे तो वैयक्तिक आयुष्यात समर्थन करत नाही; ही नागरिकांची दिशाभूल आहे. त्यामुळे या सेलिब्रिटींनी नागरिकांवर आपला असणारा प्रभाव लक्षात घेणं गरजेचं आहे. तसंच, ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आपल्याला काय करता येईल याचा विचार त्यांनीदेखील करणं गरजेचं आहे; असं मत भरतिया आणि खंडलेवाल यांनी व्यक्त केलं.

    First published:
    top videos

      Tags: Advertisement, Central government, Money