मुंबई, 12 ऑक्टोबर: नैसर्गिक आपत्ती कुणाला सांगून येत नाहीत. महापूर, वादळं, अतिवृष्टी, भूकंप, भुस्खलन अशा आपत्तींमुळं अनेकदा मोठं नुकसान होतं. सध्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. या परिस्थितीत अनेक ठिकाणी पाणी साचणं, झाडं पडणं, भिंती पडणं अशा समस्या निर्माण होत असतात. अशा परिस्थितीत मुसळधार पाऊस किंवा वादळात झाडं किंवा कुठलीही भिंत तुटून तेथे उभ्या असलेल्या वाहनांवर पडून त्यांचं मोठं नुकसान झाल्याचंही अनेकदा दिसून येतं. अशा परिस्थितीत घाबरून जाण्याची गरज नाही, तुमच्या कार इन्शुरन्समध्ये अशा समस्यांना तोंड देण्यासाठी एक कलम आहे. मात्र विमा पॉलिसी घेताना तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली होती की नाही हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या पॉलिसीमध्ये काय समाविष्ट आहे आणि नुकसान कसं कव्हर केलं जात नाही हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. यासाठी पॉलिसी घेताना त्यामध्ये समाविष्ट असलेल्या सर्व गोष्टींची पूर्ण काळजी घेतली पाहिजे आणि पॉलिसी एजंटकडून सर्व प्रकारच्या नुकसानीची माहिती मिळवली पाहिजे. असं नुकसान टाळण्यासाठी काय करावं?
- अनेक वेळा सामान्य पॉलिसी नैसर्गिक आपत्तीमुळं होणारं नुकसान भरून काढत नाही.
- म्हणून पॉलिसी घेताना अॅड -ऑन्सबद्दल विचारा.
- पॉलिसीमध्ये नैसर्गिक आपत्तींशी संबंधित अॅड ऑन जोडा.
हेही वाचा: PM Swanidhi Yojana: व्यवसायासाठी हमीशिवाय मिळतं कर्ज, ‘ही’ आहे सरकारची खास योजना
- यामध्ये लक्षात ठेवा की अॅड -ऑनमुळं पाऊस, वादळ, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे होणारं नुकसान भरून काढता येतं.
- या अॅड ऑनमध्ये इंजिन दुरुस्ती/रिप्लेसमेंट पर्याय असल्याचीही खात्री करा.
- पावसाळ्यापूर्वी अॅड ऑन कव्हर खरेदी करता येत नाही. अशा स्थितीत पॉलिसीचं नूतनीकरण करतानाच ती घ्यावी.
काय फरक पडेल? कार विमा पॉलिसीमध्ये अॅड ऑन प्लॅन घेतल्यानं तुमच्या पॉलिसीच्या प्रीमियममध्ये नक्कीच काही फरक पडेल. पण तो जास्त असणार नाही. अॅड ऑन पॅकेजेसमुळे भरलेल्या प्रीमियमवर काहीशे ते हजार रुपयांचा फरक पडतो परंतु त्यामुळं भविष्यात मोठा खर्च भागवता येतो.