Home /News /money /

BYJU's Young Genius Season 2 नोंदणी दरम्यान अतिशय उस्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला आहे

BYJU's Young Genius Season 2 नोंदणी दरम्यान अतिशय उस्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला आहे

News18 आणि BYJU's Young Genius लवकरच सुरु होणाऱ्या Season 2 सोबत मुलांच्या प्रतिभेला पंख देण्याची वेळ आली आहे.

    विशेषत: आपण Tokyo Olympics च्या पार्श्वभूमीवर नीरज चोप्रा आणि मीराबाई चानू सारख्या खेळाडूंमधील प्रतिभा आणि त्यांचा खेळ पाहिल्यानंतर आता यात काही शंकाच नाही की स्पॉटलाइट शोस्टॉपर्सवर नाही तर प्रतिभासंपन्न व्यक्तींवर केंद्रित आहे. Tokyo Olympics मध्ये भालाफेक आणि वेटलिफ्टिंगसाठी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकल्यानंतर त्यांच्या पदक-प्राप्तीच्या धैर्यपूर्ण खेळीने आणि दृढनिश्चयाने देशाला दाखवून दिले आहे की व्यक्तीमधील प्रतिभा ही मोठ्या स्तरावर पोहचेपर्यंत जग त्यांच्यापासून अनभिज्ञ असते. भारतातील सर्वात मोठ्या news network News 18 ने BYJU's Young Genius सोबत नेमके हेच ठरवले आणि साध्य केले आहे. हा शो चॅनेलवर कौशल्य सादर करणाऱ्या यंग अचिवर्सवर (प्रतिभासंपन्न मुलांवर) केंद्रित आहे ज्यांची निवड News18 चे संपादक आणि प्रतिष्ठित व्यक्तींच्या पॅनेलच्या माध्यमातून झाली होती. आता, यंग जीनियसची (Young Genius) दुसरी आवृत्ती नोंदणीसाठी खुली आहे, किमान शब्दात सांगायचे झाल्यास अर्जांची संख्या आणि गुणवत्ता आश्चर्यकारक आहे. परंतु त्याविषयी बोलण्याआधी, आपण BYJU's Young Genius च्या पहिल्या आवृत्तीत पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट गोष्टींचे अवलोकन करूयात. आपण Season 1 मध्ये काही प्रतिभाशाली मुलांचे सर्वोत्कृष्ट सादरीकरण पाहिले होते जसे की लिडियन नाधस्वरम (15 वर्षे) ज्याने डोळ्यावर पट्टी बांधून 190 बीट्स प्रति मिनिट वेगाने पियानो वाजवून लोकांना चकित केले आहे आणि मेघाली मलाबिका (14 वर्षे) तिच्या अफाट बुद्ध्यांकामुळे 'गूगल गर्ल ऑफ इंडिया' म्हणून प्रसिद्ध आहे. शोमधील इतर काही तरुण प्रतिभा संपन्न मुलांमध्ये मेन्सा सोसायटीचा सदस्य, अनेक अॅप्सचा विकासक आणि एका पुस्तकाचा लेखक असलेल्या ऋषि शिव पी (6 वर्षे) चा अविश्वसनीय असा 180 बुद्ध्यांक आहे! अवंतिका कांबळी (10 वर्षे) ही 6 अंकी वर्गमूळाच्या वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करणारी सर्वात कमी वयाची व्यक्ती आहे तर तिलुक कीसम (13 वर्षे) हा 'बारच्या खाली सर्वात लांब लिम्बो स्केटिंग' साठी गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड होल्डर आहे. BYJU's Young Genius Season 2 मोठ्या आणि भव्य स्वरुपात पार पडेल याचे वचन देतो. यासाठीची नावनोंदणी सुरु झाल्यापासून देशभरातील पालक आणि त्यांच्या मुलांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. हे BYJU's Young Genius च्या लोकप्रियतेसोबतच स्पॉटलाइटच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रतिभासंपन्न तरुणाईमधील सुप्त क्षमतांची झलकही दाखवत आहे. पहिल्या दोन आठवड्यामधील 7,500 हून अधिक मुलांच्या नावनोंदणीसोबत Season 2 ने संपूर्ण भारतातील सुप्त कलागुणांना प्रकाशात आणण्याचे वचन दिले आहे यामधील सहभागी मुले त्यांच्या प्रतिभा आणि कौशल्यांच्या जोरावर प्रेक्षकांना आणि परीक्षकांना निश्चितच विस्मयचकित करतील यात कोणतीही शंका नाही. News18 network, History चॅनेल आणि चॅनेल्सचे Viacom network सारख्या प्लॅटफॉर्मवर या शो ला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. BYJU's Young Genius Season 2 ची सामाजिक प्रसिद्धी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 2 मिलियन पलीकडे पोहोचली आहे तसेच शोच्या मायक्रोसाईटवर दररोज येणाऱ्या पर्यटकांची संख्या दररोज सातत्याने 1 लाखांच्या जवळपास असते. हा शो Network18 चे वरिष्ठ संपादक आणि अँकर आनंद नरसिम्हन यांनी होस्ट केला असून, तो जानेवारी 2022 मध्ये सुरू होईल आणि त्यामध्ये परफॉर्मिंग आर्ट्स, शिक्षण, तंत्रज्ञान, व्यवसाय, क्रीडा आणि अधिक यासारख्या विविध क्षेत्रांमधील 6 ते 15 वयोगटातील तरुण प्रतिभाशाली मुलांच्या कलागुणांचे सादरीकरण केले जाईल. प्रत्येक भाग रोमांचक अनुभूती देणारा असेल कारण या तरुण प्रतिभावंतांना उत्साहित करण्यासाठी काही नामांकित भारतीय व्यक्तींना सामील केले जाईल जे मुलांच्या विलक्षण कामगिरीचे कौतुक करण्याबरोबरच त्यांच्या या स्थानापर्यंत पोहोचण्याच्या रोचक मार्गाची सफर देखील घडवतील. तुम्ही तुमच्या मुलाला या अविश्वसनीय शोचा भाग बनवू इच्छित असल्यास कोणत्याही अडथळ्याशिवाय त्यांची प्रतिभा जगा समोर आणण्यासाठी, तुम्ही येथे लिंक ला भेट द्या आणि नोंदणी फॉर्म भरा. या प्रारंभिक सबमिशननंतर मल्टी-स्टेज मूल्यांकनाच्या प्रक्रियेकरिता मुलाचे प्रत्येक तपशील प्राप्त करण्यासाठी सविस्तर फॉर्म भरावा लागेल. या व्यतिरिक्त, तुम्ही BYJU चे अॅप डाउनलोड करू शकता आणि BYJU's Young Genius विभागात नोंदणी करू शकता. News18 आणि BYJU's Young Genius लवकरच सुरु होणाऱ्या Season 2 सोबत मुलांच्या प्रतिभेला पंख देण्याची वेळ आली आहे.
    First published:

    Tags: Byju

    पुढील बातम्या