मराठी बातम्या /बातम्या /मनी /

खुशखबर! लॉकडाऊन काळातही EMI भरलाय का? आता मिळणार कॅशबॅक

खुशखबर! लॉकडाऊन काळातही EMI भरलाय का? आता मिळणार कॅशबॅक

 ज्या कर्जादारांनी कोरोना काळात हप्ते फेडले आहेत, अशा लोकांना फेस्टिव्ह सीजन दरम्यान, व्याजावर घेतलेल्या व्याजाची रक्कम परत मिळू शकते.

ज्या कर्जादारांनी कोरोना काळात हप्ते फेडले आहेत, अशा लोकांना फेस्टिव्ह सीजन दरम्यान, व्याजावर घेतलेल्या व्याजाची रक्कम परत मिळू शकते.

ज्या कर्जादारांनी कोरोना काळात हप्ते फेडले आहेत, अशा लोकांना फेस्टिव्ह सीजन दरम्यान, व्याजावर घेतलेल्या व्याजाची रक्कम परत मिळू शकते.

  • Published by:  Karishma Bhurke
नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सामन्यांसाठी एक चांगली बातमी आहे. जर तुम्ही लॉकडाऊन दरम्यान आपल्या कर्जाचे हप्ते भरले आहेत, तर तुम्हाला बँकेकडून कॅशबॅक दिला जाऊ शकतो. केंद्र सरकारने सांगितलं की, जर बँक ग्राहकांनी लॉकडाऊनमध्ये मोराटोरियमचा (Moratorium) फायदा घेतला नसेल आणि कर्जाचे हप्ते भरले असल्यास, कॅशबॅकचा फायदा मिळेल. कोरोना काळात (Coronavirus) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ईएमआयच्या, व्याजावरील व्याजावर सूट देण्याचे निर्देश जारी केले आहेत. अशात आता ज्या कर्जादारांनी कोरोना काळात हप्ते फेडले आहेत, अशा लोकांना फेस्टिव्ह सीजन दरम्यान, बँकेने कोरोना काळात, व्याजावर घेतलेल्या व्याजाची रक्कम परत मिळू शकते. वेळेत ईएमआय भरलेल्यांना फायदा - एखाद्या कर्जदाराने मोराटोरियमचा लाभ घेतला नाही आणि कर्जाचे हप्ते वेळेत भरले आहेत, अशांना कॅशबॅक मिळणार आहे. या स्किमअंतर्गत कर्जदारांना 6 महिन्यांच्या सिंपल आणि कम्पाउंड इंट्रेस्टमधील डिफरेन्सचा लाभ मिळेल. कोरोना काळात सुविधा - आरबीआयने, कोरोना काळात ग्राहकांच्या सुविधेसाठी, सहा महिन्यांसाठी लोन मोराटोरियमची सुविधा दिली होती. या दरम्यान आर्थिकदृष्ट्या ईएमआय भरण्यास असक्षम असणाऱ्यांनी याचा फायदा घेतला. तर अनेकांनी या काळात नियमितपणे हप्ते भरले आहेत. अशा लोकांना बँक कॅशबॅक देणार आहे. लोन मोराटोरियमची सुविधा 1 मार्च ते 31 ऑगस्टपर्यंत देण्यात आली होती. त्यानंतर मोराटोरियमच्या कालावधीसंदर्भातील प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहचलं आणि सरकारने कर्जदारांना व्याजावरील व्याज आकारलं जाणार नसल्याची घोषणा केली. यामुळे सरकारी तिजोरीवर जवळपास 7000 कोटींचा परिणाम होऊ शकतो. सरकारने, 2 कोटींपर्यंत लोन घेणाऱ्यांना मोराटोरियम दरम्यान, व्याजावरील व्याज माफ करण्याची घोषणा केली. एमएसएमई (MSME) लोन, एज्युकेशन, हाउसिंग, कंज्युमर, ऑटो, क्रेडिट कार्डवरील चक्रवाढ व्याज अर्थात व्याजावरील व्याज माफ केलं जाईल, असं जाहीर करण्यात आलं.
First published:

पुढील बातम्या