जाहिरात
मराठी बातम्या / मनी / स्विगी झोमॅटोला टक्कर देणार सुनील शेट्टीचा नवा बिजनेस, पाहा तुम्ही कसं ऑर्डर करू शकता

स्विगी झोमॅटोला टक्कर देणार सुनील शेट्टीचा नवा बिजनेस, पाहा तुम्ही कसं ऑर्डर करू शकता

सुनील शेट्टी

सुनील शेट्टी

बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयासोबतच व्यावसायत पदार्पण केलं आहे. यामध्ये आता सुनील शेट्टीचं देखील नाव जोडलं जाणार आहे. सुनील शेट्टीने एका स्टार्टअप कंपनीत पैसे गुंतवले आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सुनिल शेट्टी आता फक्त अभिनेता म्हणून नाही तर एक बिझनेसमन म्हणून ओळखला जाणार आहे. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयासोबतच व्यावसायत पदार्पण केलं आहे. यामध्ये आता सुनील शेट्टीचं देखील नाव जोडलं जाणार आहे. सुनील शेट्टीने एका स्टार्टअप कंपनीत पैसे गुंतवले आहेत. सुनील शेट्टीने ज्या कंपनीत पैसे गुंतवले आहेत ती ते एक फूड डिलिव्हरी अॅप आहे. हे अॅप आता स्विगी आणि झोमॅटोला टक्कर देणार असल्याची चर्चा बाजारात रंगली आहे. या फूड डिलिव्हरी अॅपवर हॉटेल्स, रेस्टॉरंटची लिस्ट आहे. तुम्ही तुम्हाला हवं त्या हॉटेलमधून घरबसल्या ऑर्डर करू शकता. तुम्हाला हे अॅप डाऊनलोड करायचं आहे. त्यावर तुमचा नंबर अपलोड करून लोकेशन सेट करावं लागेल. त्यानंतर तुम्ही रेस्टॉरंट निवडून तिथून ऑर्डर करू शकता.

Aadhaar नंबरवरुन तुमचं बँक अकाउंट हॅक होऊ शकतं का? पाहा काय आहे सत्य

इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (AHAR) द्वारे समर्थित मुंबईस्थित Waayu ने मुंबईत आपली सेवा सुरू केली आहे. यात मुंबई बीएमसी, मीरा भाईंदर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पालघरच्या बहुतांश भागातील रेस्टॉरंट्सचा समावेश आहे. मुंबईनंतर कंपनी इतर मेट्रो आणि नॉन-मेट्रो शहरांमध्येही हे अॅप सुरू करण्याच्या विचारात आहे. याबाबत सध्या कामं सुरू असून लवकरच लाँच होईल अशी ग्वाही ग्राहकांना दिली जात आहे. कंपनीने अभिनेता सुनील शेट्टीची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे, याशिवाय, त्याच्याकडे कंपनीमध्ये इक्विटी देखील आहे. शेट्टी यांनी यापूर्वीही अनेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

लोकांना नोकरी देणाऱ्या कंपनीचा कर्मचाऱ्यांना Email, एका रात्रीत सगळं संपलं अॅपवर 1500 हून अधिक रेस्टॉरंट्स डेस्टेक होरेकाचे अनिरुद्ध कोटगिरे आणि मंदार लांडे हे ‘वायू’ अॅपचे संस्थापक आहेत. सध्या, या अॅपवर 1500 हून अधिक रेस्टॉरंटची लिस्ट देण्यात आली आहे.25,000 हून अधिक डाउनलोडर्स आहेत. अॅप सध्या सर्व आऊटलेट्सकडून निश्चित शुल्क म्हणून प्रति महिना रु 1,000 आकारत आहे. हे शुल्क नंतर 2,000 रुपये केले जाऊ शकते. यासोबतच वायू अॅपला ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) शी जोडण्यासाठी प्लॅन तयार केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात