मुंबई, 15 नोव्हेंबर: भारतीय रेल्वेनं प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी काही नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. प्रवाशांच्या समस्या लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयानं अनारक्षित तिकिटांवर मोठा निर्णय घेतला आहे. अनारक्षित तिकीट बुकिंगबाबत भारतीय रेल्वेनं केलेले बदल अनारक्षित तिकीट बुकिंग करून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना सुविधा देणार आहेत. वास्तविक या अंतर्गत मंत्रालयानं अॅपवरून अशाप्रकारे तिकीट बुक करण्यासाठी अंतर वाढवलं आहे. रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार रेल्वे विभागानं मर्यादित अंतराच्या तिकिटांचा गैरवापर थांबवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.
आता तुम्ही प्रवास सुरू करण्याच्या स्टेशनपासून पूर्वीपेक्षा जास्त अंतरावरून अॅपद्वारे घरी बसून तिकीट बुक करू शकाल. म्हणजेच ज्या स्थानकापासून तुम्हाला प्रवास सुरू करायचा आहे, त्या स्टेशनपासून तुम्ही खूप दूर असलात तरीही तुम्ही तिकीट बुक करू शकता. अनारक्षित तिकिटांवर या सवलतीमुळं प्रवाशांचा बराच वेळ वाचणार आहे. प्रवाशांची तिकीट काढण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहण्यापासून सुटका होणार आहे. आतापर्यंत तुम्ही प्रवासाच्या सुरुवातीच्या स्टेशनपासून 2 किमी दूर अॅपद्वारे अनारक्षित तिकिटे बुक करू शकता.
हे लक्षात घेण्यासारखं आहे की रेल्वेनं प्रवास करण्यासाठी आरक्षित आणि अनारक्षित अशी दोन प्रकारची तिकिटे बुक केली जातात. आरक्षित तिकिटे ऑनलाइन किंवा अॅपद्वारे कुठूनही कोणत्याही ठिकाणासाठी बुक केली जाऊ शकतात, परंतु अनारक्षित तिकिटे प्रवास सुरू होण्याच्या स्थानकापासून मर्यादित अंतरापर्यंतच बुक करता येतात. मात्र आता दोन किमीचे अंतर 20 किमी करण्यात आलं आहे.
हेही वाचा: डेबिट कार्डशिवाय करा ऑनलाईन पेमेंट, अवघ्या काही सेकंदात होईल काम
‘या’ ट्रेनसाठी बदलला नियम-
स्थानकापासून दोन किमीचं अंतर असताना अनेकवेळा मोबाईल नेटवर्क गायब होत असल्याची बाब रेल्वे बोर्डाच्या निदर्शनास आली. त्यामुळे प्रवाशांना इच्छा असूनही रेल्वेचं तिकीट काढता येत नाही. या कारणास्तव आता हे अंतर मंत्रालयानं 2 किमीवरून 20 किमी केलं आहे. रेल्वेनं उपनगरीय आणि मेल-एक्स्प्रेसमधून अनारक्षित तिकीट बुक करण्याच्या नियमात बदल केला आहे. पण EMU सारख्या ट्रेनमध्ये पूर्वीप्रमाणेच नियम लागू होतील.
नवीन प्रणाली काय आहे?
भारतीय रेल्वेच्या नवीन प्रणालीनुसार, उपनगरी नसलेल्या वर्गांसाठी, पाच किलोमीटरऐवजी, 20 किलोमीटर अंतरावरूनही अनारक्षित तिकीट बुक करता येणार आहे. याशिवाय उपनगरीय विभागासाठी तिकीट बुक करण्यासाठी हे अंतर दोन किमीवरून पाच किमी करण्यात आले आहे. ही सुविधा सुरू झाल्यानंतर आता प्रवाशांची स्टेशनवर पोहोचल्यानंतर तिकिटासाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगांपासून सुटका होणार आहे. कारण आता तो घरी बसून जनरल तिकीट बुक करू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Railway