• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Big Bazar चा धमाकेदार फेस्टिव्ह ऑफर; प्रत्येक खरेदीवर मिळवा सोन्या-चांदीची नाणी

Big Bazar चा धमाकेदार फेस्टिव्ह ऑफर; प्रत्येक खरेदीवर मिळवा सोन्या-चांदीची नाणी

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

दिवाळीनिमित्त बिग बाजारच्या धनोत्सव फेस्टिव्हलमध्ये ठराविक खरेदीवर गृहोपयोगी वस्तू भेट मिळत आहेत. तसंच सोन्या-चांदीच्या वस्तूही मिळत आहेत.

 • Share this:
  मुंबई,27ऑक्टोबर-  दिवळीचा (Diwali) सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. लोकांनी दिवाळीची जोरदार तयारी सुरू केली आहे. विविध वस्तूंनी बाजारपेठा सजल्या असून नागरिक देखील खरेदीसाठी गर्दी करत आहेत. सणासुदीच्या दिवसांमध्ये (Festive season) जवळपास सर्वच दुकानांमध्ये ग्राहकांना फेस्टिव्ह ऑफर (Festive offer) दिल्या जातात. जास्तीत जास्त ग्राहकांनी आपल्याकडूनचं खरेदी करावी, हा त्यामागचा उद्देश असतो. सर्व गोष्टी एकाच छताखाली देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बिग बाजार (Big Bazar) स्टोरनं देखील दिवाळीनिमित्त आपल्या ग्राहकांसाठी 'धनोत्सव शॉपिंग फेस्टिव्हल' (Dhanotsav Shopping festival) आणला आहे. बिग बाजार स्टोअर, अॅप (big bazar app) किंवा ई-कॉमर्स वेबसाइटद्वारे (Big bazar website) खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 'धनोत्सव शॉपिंग फेस्टिव्हल'च्या निमित्त सोन्या-चांदीची नाणी मिळवण्याची संधी आहे. 23 ऑक्‍टोबर ते 7 नोव्हेंबर 2021 या कालावधीत ग्राहकांना त्यांच्या खरेदीच्या बिलानुसार सोन्या-चांदी नाणी देण्याची योजना बिग बाजार स्टोअरनं सुरू केली आहे. 'धनोत्सव शॉपिंग फेस्टिव्हल'दरम्यान सुरू करण्यात आलेली ही नाण्यांची ऑफर काय आहे, हे आपण जाणून घेऊया... 25 हजार रुपयांपासून ते 49 हजार 999 रुपयांपर्यंतची खरेदी केल्यास त्यावर 40 ग्रॅम वजनाचं चांदीचं नाणं मिळेल. 50 हजार रुपयांची खरेदी केल्यास तुम्हाला 1 ग्रॅम वजनाचं सोन्याचं नाणं मिळेल. जर तुम्ही 1 लाख ते 1 लाख 99 हजार 999 रुपयांपर्यंतची खरेदी केली तर तुम्हाला त्यासोबत 2 ग्रॅम सोन्याचं नाणं मिळेल. 2 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीची खरेदी केल्यास तुम्हाला 3 ग्रॅम वजनाचं सोन्याचं नाणं मिळेल. 'या' वस्तूंच्या खरेदीवर मिळणार मोठी सूट बिग बाजार स्टोअर्समध्ये विनामूल्य सोन्या-चांदीच्या नाण्यांच्या ऑफर व्यतिरिक्त इतर देखील उत्तम ऑफर्स मिळत आहेत. सणासुदीचे ट्रेंडी पोशाख, मिठाई, चॉकलेट्स, स्वयंपाकघरातील अपग्रेड उपकरणं आणि गृह सजावटीच्या वस्तूसुद्धा बिग बाजारमधील धनोत्सव शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये चांगल्या ऑफर्ससह उपलब्ध आहेत. काही प्रमुख आकर्षक ऑफर्सबद्दल आपण माहिती घेऊया... 15 हजार रुपयांची खरेदी केल्यास त्यावर 4 हजार 998 रुपयांची सामानाची ट्रॉली मोफत मिळेल. 10 हजार रुपयांची खरेदी केल्यास पीठ(आटा), डाळ, तांदूळ, तूप, साखर आणि 1 हजार रुपयांचे कपडे मोफत मिळतील. 6 हजार रुपयांच्या खरेदीवर तूप, साखर आणि 500 रुपयांचे कपडे मोफत मिळतील. 3 हजार रुपयांची खरेदी केल्यास त्यावर साखर आणि 250 रुपयांचे कपडे मोफत मिळतील. आणखी काही आकर्षक ऑफर्स - तुम्हाला कोरयोच्या 43 इंची फुल एचडी एचडी एलसीडी टीव्हीवर (Koryo 43 Full HD LED TV) 16 हजार 999 ची सूट मिळेल. या टीव्हीची मूळ किंमत 39 हजार 990 रुपये इतकी आहे. 1 हजार 600 रुपये किमतीच्या 10 पीस सेलो ओपलवेयर (Cello Opalware) डिनर सेटवर 599 रुपये सूट मिळणार आहे. 3 हजार 630 रुपये किमतीच्या प्रेस्टीज बीवायके ब्लॅक डेकोर 3 पीस सेटवर 1 हजार 599 रुपयांची सूट दिली जाणार आहे. 7 हजार 250 रुपये किमतीच्या स्कायबॅग्स, व्हीआयपी, सफारी, अॅरिस्टोक्रेट, कॉमिलियंट हार्ड अँड सॉफ्ट ट्रॉली बॅग्जवर 70 टक्के सूट मिळणार आहे. ड्रीमलाइन, रेमंड डबल बेड शीट सेट को-ऑर्डिनेटेड पिलो कवर के साथ एमआरपी 1,999 रुपये है. इस पर एक खरीदो और एक मुफ्त पाओ का ऑफर है. 1 हजार 999 रुपये किमतीच्या ड्रीमलाइन, रेमंड ब्रँडच्या पिलो कवरसह मिळणाऱ्या डबल बेड शीट सेटच्या खरेदीवर आणखी एक सेट फ्रि मिळणार आहे. गिफ्ट पॅक मेडली आणि स्निकर्स, होम पॅक डेअरीमिल्क सिल्क, बाउंटी आणि स्निकर्स, सनफिस्ट डार्क फॅन्टसी चोको फिल, लोटे, ओरियन या चॉकलेट्सच्या खरेदीवर बाय 2 गेट 1 ऑफर मिळत आहे. आनंद, मिल्कफूड आणि हेरिटेज ब्रँडचं 1 लीटर तूप फक्त 398 रुपयांना मिळणार आहे. 500 ग्रॅम कर्मिक बादाम आणि 400 ग्रॅम काजूचा व्हॅल्यू पॅक 839 रुपयांना मिळत आहे. फ्यूचर ग्रुपचे डिजिटल, मार्केटिंग आणि ई-कॉमर्स सीएमओ पवन सारडा म्हणाले की, 'बिग बाजार हे भारतातील लोकप्रिय आणि दर्जेदार डिपार्टमेंटल स्टोअर आहे. त्यामुळं दिवाळीच्या सणानिमित्त ग्राहकांना चांगला अनुभव देण्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केली आहे. आम्ही आमच्या ग्राहकांना खरेदीवर सोन्या-चांदीच्या नाण्यांसह, जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याची हमी देतो. एकाच ठिकाणी पूर्ण खरेदी करता यावी यासाठी बिग बाजार विविध प्रकारच्या उत्पादनांची विस्तृत श्रेणी ऑफर करत आहे. याशिवाय दोन तासात होम डिलीवरी सुविधा देखील दिली जात आहे. एकाच ठिकाणी करता येईल सर्व खरेदी बिग बाजारनं ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर आणि भेटवस्तू देण्याची योजना सुरू केली आहेच. याशिवाय प्रत्येक ग्राहकाला आपल्या मनाप्रमाणं सणासुदीची खरेदी करता यावी यासाठी स्टोअरमधील वस्तूंच्या किमती आणखी कमी केल्या आहेत. बिग बझारच्या सर्व शॉपिंग पोर्टल्स आणि आउटलेटवर उपलब्ध असलेल्या विशेष दरांमध्ये तुम्ही दैनंदिन किराणा सामान आणि सणासुदीच्या भेटवस्तूंच्या खरेदीचा आनंद घेऊ शकता.
  First published: