जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Tax-Savings FD: ‘या’ बँकांच्या ‘एफडी’त करा गुंतवणूक; टॅक्सही वाचेल अन् व्याजही मिळेल

Tax-Savings FD: ‘या’ बँकांच्या ‘एफडी’त करा गुंतवणूक; टॅक्सही वाचेल अन् व्याजही मिळेल

Tax-Savings FD: ‘या’ बँकांच्या ‘एफडी’त करा गुंतवणूक; टॅक्सही वाचेल अन् व्याजही मिळेल

Tax-Savings FD: ‘या’ बँकांच्या ‘एफडी’त करा गुंतवणूक; टॅक्सही वाचेल अन् व्याजही मिळेल

Tax-Savings FD: सर्व स्मॉल फायनान्स बँका, परदेशी बँका आणि लहान-खाजगी क्षेत्रातील बँका टॅक्स सेव्हिंग एफडीवर 7.4 टक्के व्याज देत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

 मुंबई, 16 जुलै: रिझर्व्ह बँकेनं या वित्तीय वर्षात आतापर्यंत रेपो दरात 90 बेसिस टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळं रेपो रेट 4.9 टक्क्यांवर पोहोचला आहे. एचडीएफसी बँक आणि Deutsche Bank बँकेसारख्या तमाम बँकांनी आरबीआयच्या या निर्णयानंतर आपल्या टॅक्स सेविंग फिक्स्ड डिपॉजिटवरील व्याजदरात कपात केली आहे. सर्व स्मॉल फायनान्स बँका, परदेशी बँका आणि लहान-खाजगी क्षेत्रातील बँका टॅक्स सेव्हिंग एफडीवर (Tax-Savings FD) 7.4 टक्के व्याज देत आहेत. BankBazaarने ही माहिती दिली आहे. आयकर कायद्याच्या सेक्शन 80 सी नुसार 1.5 लाखांपर्यंतच्या गुंतवणूक करमुक्त ठरू शकते. परंतु तरीही गुंतवणूक सल्लागारांच्या सल्ल्यानुसार केवळ पैसे वाचवण्यासाठी पैसे एफडीत टाकू नयेत. तुमच्या फायनॅन्शियल प्लॅनला लक्षात ठेवून टॅक्स सेव्हिंग एफडीमध्ये गुंतवणूक करायला हवी. एक लक्षात घ्यायला हवं की, टॅक्स सेव्हिंग एफडीचा लॉकइन पीरियड 5 वर्षांचा असतो. यामध्ये तुम्हाला परिपक्वता अवधीपूर्वी पैसे काढता येत नाहीत. चला जाणून घेऊया अशा एफडींबद्दल.. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक (Ujjivan Small Finance Banck)- ही बँक टॅक्स सेव्हिंग एफडीवर 7.4 टक्के व्याज देत आहे. सर्व स्मॉल फायनान्स बँकांमध्ये उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक सर्वात जास्त व्याज देत आहे. या बँकेच्या टॅक्स सेव्हिंग एफडीमध्ये 1.5 लाख रुपये गुंतवल्यास 5 वर्षांत ही रक्कम 2.16 लाख होईल. Deutsche Bank: ही बँक टॅक्स सेव्हिंग एफडीवर 7 टक्के व्याज देत आहे. विदेशी बँकांमध्ये ही बँक टँक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिटवर सर्वाधिक व्याज देत आहेत. या बँकेच्या टॅक्स सेव्हिंग एफडीमध्ये 1.5 लाख रुपये गुंतवल्यास 5 वर्षांत ही रक्कम 2.12 लाख होईल. हेही वाचा:   Soil Health Card: सरकारच्या मदतीनं गावात राहूनच करा हा व्यवसाय, होईल शेतकऱ्यांची गर्दी अन् लाखोंची कमाई AU Small Finance Bank: ही बँक टॅक्स सेव्हिंग एफडीवर 6.9 टक्के व्याज देत आहे. या बँकेच्या टॅक्स सेव्हिंग एफडीमध्ये 1.5 लाख रुपये गुंतवल्यास 5 वर्षांत ही रक्कम 2.11 लाख होईल. Suryoday small Finance Bank: ही बँक टॅक्स सेव्हिंग एफडीवर 6.75 टक्के व्याज देत आहे. या बँकेच्या टॅक्स सेव्हिंग एफडीमध्ये 1.5 लाख रुपये गुंतवल्यास 5 वर्षांत ही रक्कम 2.10 लाख होईल. DCB Bank- ही बँक टॅक्स सेव्हिंग एफडीवर 6.6 टक्के व्याज देत आहे. या बँकेच्या टॅक्स सेव्हिंग एफडीमध्ये 1.5 लाख रुपये गुंतवल्यास 5 वर्षांत ही रक्कम 2.08 लाख होईल. Indusland Bank- ही बँक टॅक्स सेव्हिंग एफडीवर 6.5 टक्के व्याज देत आहे. या बँकेच्या टॅक्स सेव्हिंग एफडीमध्ये 1.5 लाख रुपये गुंतवल्यास 5 वर्षांनंतर 2.07 लाख रुपये मिळतील. Yes Bank- ही बँक टॅक्स सेव्हिंग एफडीवर 6.5 टक्के व्याज देत आहे. या बँकेच्या टॅक्स सेव्हिंग एफडीमध्ये 1.5 लाख रुपये गुंतवल्यास 5 वर्षांनंतर 2.07 लाख रुपये मिळतील. याशिवाय सर्व छोट्या बँका जास्तीत जास्त नवी डिपॉझिट मिळवण्यासाठी फिक्स्ड डिपॉझिटवर जास्त व्याजदर देत आहेत. एक लक्षात घ्यायला हवं की, रिझर्व्ह बँकेची एक सब्सिडियरी Deposit Insurance and Credit Guaratee Corporation (DICGC) फिक्स्ड डिपॉजिटमध्ये 5 लाखांपर्यंत गुंतवणूक करण्याची मुभा देते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात