मराठी बातम्या /बातम्या /मनी /

होम लोनचे हफ्ते थकल्यास पडू शकतं महागात; तुमच्यावर होऊ शकते कारवाई

होम लोनचे हफ्ते थकल्यास पडू शकतं महागात; तुमच्यावर होऊ शकते कारवाई

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

कर्ज फेडण्यात आपण अयशस्वी ठरत असलो तर घराचा लिलाव करण्याची वेळही येऊ शकते. शिवाय बँकही तुमच्यावर कारवाई करू शकते.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : आपलं छानसं घर असायला हवं, अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. त्यासाठी पै न् पै जोडून स्वप्नातलं घर बांधणं किंवा खरेदी करण्यासाठी अनेक जण सातत्यानं धडपड करतात. सध्या घरांच्या किमतीच इतक्या आहेत की, बचत करून तुम्ही घराचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे बहुतांश लोक बँकेकडून कर्ज काढून हक्काच्या घरात राहायला जातात. एकदा का कर्ज घेतलं, की वेळेवर त्याची फेड होणं आवश्यक असतं. कर्ज फेडण्यात आपण अयशस्वी ठरत असलो तर घराचा लिलाव करण्याची वेळही येऊ शकते. शिवाय बँकही तुमच्यावर कारवाई करू शकते.

घराचं बांधकाम, त्याची खरेदी अथवा कार खरेदीसाठी दिलं जाणारं कर्ज हे सुरक्षित कर्जाच्या श्रेणीत मोडतं. कारण अशा प्रकारचं कर्ज घेताना तुम्हाला हमी म्हणून बँकेकडे संपत्ती तारण म्हणून ठेवावी लागते.

कारवाईच्या आधी दिला जातो इशारा

कुठल्याही कारणाने तुम्ही कर्जाचा ईएमआय देऊ शकत नसाल तर बँकेकडून तुम्हाला यासंबंधीचा इशारा आधीच दिला जातो. बँकेचे सतत तीन हफ्ते थकले असतील तर कर्जासंदर्भात कायदेशीर नोटीस पाठवली जाते. नोटिसीनंतरही पूर्ण ईएमआय न भरल्यास कर्ज घेणाऱ्या संबंधित व्यक्तीला बँक डिफॉल्टर म्हणजे कर्जबुडवा घोषित करते.

त्यानंतर बँकेकडून तुम्हाला कधीही कर्ज मिळू शकत नाही. वेळेत कर्जाची फेड करण्यात आपण अपयशी ठरलो तर आपलं आर्थिक रेकॉर्ड खराब होतं व क्रेडिट स्कोअरही बिघडतो. शिवाय बँकेकडून कर्जही मिळत नाही. काही ओळख वापरून जर कर्ज घेण्याचं ठरवलं तर बँकेच्या कडक नियम व अटींवर जास्त व्याजदरावर कर्ज घ्यावं लागतं.

…तर कर्जाचं खातं एनपीए समजलं जातं

बँक किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतल्यानंतर सलग तीन हफ्ते जमा न केल्यास बँकेकडून कारवाईचा इशारा दिला जातो. त्याकडेही दुर्लक्ष केलं तर बँकेच्या कर्जाचं खातं एनपीए झालं असं समजलं जातं. इतर वित्तीय संस्थांच्या प्रकरणात याची कालमर्यादा 120 दिवसांपर्यंत असते.

अशा स्थितीत डिफॉल्टर खातेदाराला कायदेशीर नोटीस पाठवली जाते. यात मर्यादित कालावधीत थकबाकी भरण्यास सांगितलं जातं. तरीही खातेदार कर्जाचे हफ्ते भरण्यास असमर्थ ठरला तर तारण ठेवलेल्या मालमत्तेचा लिलाव केला जातो.

मालमत्तेचा होऊ शकतो लिलाव

सुरक्षित कर्ज घेताना मालमत्ता गहाण ठेवली जाते. कर्जदाराला ते फेडण्यात अपयश आलं तर ही मालमत्ता विकून कर्जाची भरपाई होते. कर्ज फेडलं गेलं नाही तर बँक तुमच्या मालमत्तेवर ताबा मिळवू शकते.

कायद्याने तो बँकेचा अधिकारच असतो. त्यामुळे तारण ठेवलेल्या मालमत्तेला वाचवण्यासाठी तुम्हाला बँकेकडून घेतललं कर्ज फेडावंच लागतं. कर्ज फेडलं तर मालमत्तेच्या लिलावाची वेळ येणार नाही.

बँकेकडून देते अनेकदा संधी

घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी बँकेकडून कर्जदार व्यक्तीला भरपूर वेळ दिला जातो. पण तरीही तो परतफेड करण्यात अयशस्वी ठरला तर बँक त्याला रिमायंडर नोटीस पाठवते. त्यानंतरही प्रतिसाद मिळाला नाही तर बँक त्याच्या मालमत्तेवर टाच आणते व त्याचा लिलाव केला जातो व त्यातून कर्जाच्या रकमेची भरपाई केली जाते.

First published:

Tags: Bank services, Bank statement, Home Loan, Instant loans, Pay the loan