जाहिरात
मराठी बातम्या / मनी / लाईफ सर्टिफिकेट ऑनलाइन कसं जमा करायचं? बँक ऑफ महाराष्ट्रने दिली माहिती

लाईफ सर्टिफिकेट ऑनलाइन कसं जमा करायचं? बँक ऑफ महाराष्ट्रने दिली माहिती

लाईफ सर्टिफिकेट ऑनलाइन कसं जमा करायचं? बँक ऑफ महाराष्ट्रने दिली माहिती

आता बँकेनं पेन्शनधारकांना १० वेळा बँकेत फेऱ्या घालाव्या लागू नयेत म्हणून आता व्हिडीओ कॉलवर किंवा ऑनलाइन सर्टिफिकेट जमा करता येतं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : पेन्शन धारकांसाठी नोव्हेंबर महिना हा खूप महत्त्वाचा असतो. या महिन्यात त्यांना लाईफ सर्टिफिकेट जमा करायचं असतं. जर ते केलं नाही तर त्यांना पेन्शन मिळणार नाही. आता बँकेनं पेन्शनधारकांना १० वेळा बँकेत फेऱ्या घालाव्या लागू नयेत म्हणून आता व्हिडीओ कॉलवर किंवा ऑनलाइन सर्टिफिकेट जमा करता येतं. तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्रचे ग्राहक असाल तर लाईफ सर्टिफिकेट कसं जमा करायचं आहे ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. घरबसल्या तुम्ही लाईफ सर्टिफिकेट जमा करू शकता. त्यामुळे तुमचं पेन्शन सुरळीत सुरू राहील. सगळ्यात आधी तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्रच्या वेबसाइटवर जायचं आहे. तिथे ऑनलाइन जीवन प्रमाणपत्र सादर करणे असा एक पर्याय दिसेल. त्यावर क्लील करा. त्यानंतर एक नवीन पेज सुरू होईल. या पेजवर तुम्हाला तुमची भाषा निवडायची आहे. पुढे क्लीक केल्यावर तुम्हाला डिटेल्स अपलोड करायचे आहेत. तुम्हाला बँकेचा अकाउंट नंबर देखील अपलोड करायचा आहे. तिथे दिलेली माहिती अपलोड करा आणि सब्मिट करा. बँक ऑफ बडोदा आणि याआधी गेल्या वर्षी देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या पेन्शनर्सना व्हिडीओ कॉलद्वारे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा दिली होती. 60 वर्षांवरील लोकांना 31 नोव्हेंबर 2022 पर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. 31 नोव्हेंबरच्या आधी जर ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर पेन्शनचा लाभ घेता येणार नाही. अँड्रॉइड फोनवरून असं जमा करा जीवन प्रमाणपत्र- जर तुमच्याकडे अँड्रॉईड मोबाईल असेल तर तुम्ही मोबाईलवरूनही तुमचे जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन सबमिट करू शकता. आज आम्ही तुम्हाला काही स्टेप्समध्ये फेस रेकग्निशन पद्धतीनं पेन्शनधारकाचं डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याची संपूर्ण प्रक्रिया सांगणार आहोत. जेणेकरून पेन्शनधारकांना घरी बसून पेन्शनचा लाभ घेता येईल.

News18लोकमत
News18लोकमत

सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या अँड्रॉईड फोनमध्ये गुगल प्ले स्टोअर उघडावं लागेल. तुम्हाला तेथून आधार फेस आयडी अ‍ॅप (Aadhaar face ID app) डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही भारत सरकारच्या जीवन प्रमाणच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तेथून अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात