मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Bank Account : पीपीएफ, ईपीएफ अन् पोस्ट कार्यालयातील क्लेम न केलेली रक्कम कुठे होते जमा; जाणून घ्या

Bank Account : पीपीएफ, ईपीएफ अन् पोस्ट कार्यालयातील क्लेम न केलेली रक्कम कुठे होते जमा; जाणून घ्या

देशात बँक खाते (Bank Account), पब्लिक प्रॉव्हिडेड अकाऊंट्स (Public Provided Accounts) आणि पोस्ट कार्यालयातील (Post Office) विविध योजनांची खाती मोठ्या प्रमाणात निष्क्रिय होतात.

देशात बँक खाते (Bank Account), पब्लिक प्रॉव्हिडेड अकाऊंट्स (Public Provided Accounts) आणि पोस्ट कार्यालयातील (Post Office) विविध योजनांची खाती मोठ्या प्रमाणात निष्क्रिय होतात.

देशात बँक खाते (Bank Account), पब्लिक प्रॉव्हिडेड अकाऊंट्स (Public Provided Accounts) आणि पोस्ट कार्यालयातील (Post Office) विविध योजनांची खाती मोठ्या प्रमाणात निष्क्रिय होतात.

  मुंबई, 22 सप्टेंबर : देशात बँक खाते (Bank Account), पब्लिक प्रॉव्हिडेड अकाऊंट्स (Public Provided Accounts) आणि पोस्ट कार्यालयातील (Post Office) विविध योजनांची खाती मोठ्या प्रमाणात निष्क्रिय होतात. एका निश्चित कालावधीनंतर या खात्यातील पडून असलेल्या निधीला दावा न केलेली रक्कम (Unclaimed Amount) म्हणून घोषित केलं जातं. दीर्घ कालावधीत विविध योजनांमध्ये असलेल्या पैशांवर कुणी दावा सांगितला नाही तर ती रक्कम विविध फंडांमध्ये पाठवली जाते.

  कुठलंही खातं निष्क्रिय होण्यामागे खातेधारकाचा (Account Holder) मृत्यू होणं, कुटुंबीयांना मृताच्या खात्याबद्दलची माहिती नसणं, चुकीचा पत्ता किंवा खात्यात कुटुंबातील सदस्याचं नामनिर्देशन (Nominee) नसणं अशी अनेक कारणं आहेत. अनेकदा तर खातेधारकच त्याच्या खात्याबद्दल विसरून जातो. अशा विविध कारणांनी विविध संस्थांमध्ये लोकांचे कोट्यवधी रुपये दाव्याविना पडून आहेत. ठराविक काळात यावर हक्क सांगितला नाही तर ती रक्कम विशेष फंडमध्ये जमा होते.

  हे ही वाचा : विप्रो कंपनीने 300 कर्मचाऱ्यांना काढलं, शेअर बाजारात बसणार का मोठा फटका?

  ज्येष्ठ नागरिक कल्याण निधी (Senior Citizen’s Welfare Fund)

  पीपीएफ, पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट्स, ईपीएफ, आरडी आणि विमा खात्यात (Insurance) दावा न केलेली रक्कम एससीडब्ल्युएफ (SCWF) फंडमध्ये जमा होते. 2015 मध्ये या फंडची स्थापना झाली होती. या फंडमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी सुरूवातीला पीपीएफ, ईपीएफ, आरडी चालवणाऱ्या संस्था ग्राहकाशी संपर्क साधतात व पैसे काढण्यासंबंधी सूचना करतात.

  खात्याचा कालावधी पूर्ण (Account Mature) होईपर्यंत 7 वर्ष पैसे काढले गेले नाहीत तर ती रक्कम ज्येष्ठ नागरिक कल्याण निधीत पाठवली जाते. फंडमध्ये पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर 25 वर्षांपर्यंत खातेधारक पैसा काढू शकतात. पीपीएफ, पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट किंवा ईपीएफच्या दावा न केलेल्या खात्यांतून पैसे काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिक निधीशी संपर्क साधावा लागतो. काही कागदपत्रांची पूर्तता करून खातेधारक किंवा त्यांनी नामनिर्देशित केलेली कुटुंबातील व्यक्ती हे पैसे काढू शकते.

  गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी

  म्युच्युअल फंड (Mutual Fund) आणि स्टॉकशी (Stock) संबधित दावा न केलेली रक्कम गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधीत जमा होते. जर 7 वर्षांपर्यंत म्युच्युअल फंडमधील जमा रक्कम आणि डिव्हिडंट (Dividend) खातेधारकांनी घेतले नाहीत तर ती आययपीएफ (Investor Education And Protection Fund) फंडामध्ये पाठवली जाते. खातेधारक iepf.gov.in या वेबसाइटला भेट देऊन दावा न केलेली रक्कम कुठे जमा केलीय याची माहिती घेऊ शकतात. ती रक्कम कशी घ्यायची या संदर्भात माहितीही वेबसाइटवर घेता येते.

  हे ही वाचा : रुपयाने मोडले सगळे रेकॉर्ड! इतिहासातील सर्वात मोठी घसरण, सणासुदीला वाढणार महागाई

  ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी

  एखादा खातेधारक जेव्हा बचत खातं, चालू खातं, फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) आणि रिकरिंग डिपॉझिट (Recurring Deposit) खात्यात 10 वर्षांपर्यंत काही उलाढाल करत नाही तेव्हा त्या खात्यातील रक्कम अनक्लेम्ड म्हणून घोषित होते. दावा न केलेली ही रक्कम रिझर्व्ह बँकेच्या ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधीत म्हणजेच डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेरनेस फंड (DEAF) मध्ये टाकली जाते. एखाद्या निष्क्रिय बँक अकाउंटच्या कागदपत्रांत नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीचं नाव नमूद असल्यास ती व्यक्ती अगदी सोप्या पद्धतीनं त्या रकमेवर दावा करू शकते. नामनिर्देशित असलेल्या व्यक्तीला खातेधारकाचं मृत्यू प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक असतं. यासोबतच त्या व्यक्तीला केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रं देणं गरजेचं असतं.

  First published:

  Tags: SBI bank

  पुढील बातम्या