नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर : देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. आपल्या ट्विटच्या माध्यमातून ते देशभरात दडलेल्या टॅलेंटला लोकांसमोर आणत असतात. तर कधी आपल्या शब्दातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र, यावेळी त्यांनी ट्विटद्वारे आपली निराशा व्यक्त केली आहे. स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे होणाऱ्या नुकसानबद्दल त्यांनी इशारा दिला आहे.
महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी मोबाईलच्या व्यसनाबद्दल एक व्यंगचित्र शेअर करून आपली निराशा व्यक्त केली आहे. आनंद महिंद्राच्या या ट्विटवर अनेक यूजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
That’s a seriously depressing cartoon. But it’s made me decide to put down the phone (after tweeting this!) and ensure that my Sunday is spent with my neck straight and my head up… pic.twitter.com/seEdiAhQAC
— anand mahindra (@anandmahindra) November 27, 2022
'मी माझी मान सरळ ठेवण्याचा प्रयत्न करेन'
वास्तविक आनंद महिंद्रा यांनी हे व्यंगचित्र ट्विटरवर शेअर केले असून ते गंभीरपणे निराश करणारे व्यंगचित्र असल्याचे त्यांनी लिहिले आहे. यामुळे मला फोन खाली ठेवावा लागला. हे ट्विट केल्यानंतर मी माझा फोन खाली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी असेही लिहिले की, रविवारी मान सरळ राहील आणि दिवस डोके वर करून घालवता येईल.
वाचा - Richest Indian : रुपया 'गरीब' झाला तरी श्रीमंत झाले अधिक श्रीमंत
या व्यंगचित्रात एका रुग्णालयाचे छायाचित्र देण्यात आले असून त्यात तीन वृद्ध लोक रिकाम्या हाताने मोबाईल धरून खाली पाहत आहेत. मात्र, हातात मोबाईल नसून तो रिकामाच आहे.
मोबाईलच्या व्यसनामुळे अनेक मानसिक व शारीरिक विकार होण्याची भीती
किंबहुना, आपण मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये इतके व्यस्त झालो आहोत की आपले शरीर नतमस्तक झाले आहे आणि आपण कधी मान वर करण्याचा प्रयत्नही करत नाही, हे या व्यंगचित्रातून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अशीच परिस्थिती राहिली, तर हॉस्पिटलमध्ये गेल्यावर या अवस्थेत आपण असू. आनंद महिंद्रा यांची ही पोस्ट व्हायरल होत आहे.
अनेकदा वेळोवेळी असे संशोधन आपल्यासमोर येते जे स्मार्टफोनच्या अतिवापराच्या हानिकारक परिणामांबाबत इशारा देतात. आजकाल लहान मुले व्हिडीओ पाहताना किंवा गेम खेळत असताना हातात स्मार्टफोन धरलेले दिसतात. हा ट्रेंड त्रासदायक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anand mahindra