जाहिरात
मराठी बातम्या / मनी / सेवानिवृत्त सैनिकाने सुरू केला मत्स्यपालन व्यवसाय, कमी खर्चात कमवतोय चांगला नफा

सेवानिवृत्त सैनिकाने सुरू केला मत्स्यपालन व्यवसाय, कमी खर्चात कमवतोय चांगला नफा

सेवानिवृत्त सैनिकाने सुरू केला मत्स्यपालन व्यवसाय, कमी खर्चात कमवतोय चांगला नफा

सेवानिवृत्त सैनिकाने मत्स्यपालन व्यवसाय सुरू केला आहे. यामध्ये तो कमी खर्चात अधिक नफा कमावत आहे.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    विकांत कुमार, प्रतिनिधी  मधेपुरा,19 मे : गेल्या काही वर्षांपासून मासे उत्पादनासाठी बायोफ्लॉक पद्धत खूप लोकप्रिय होत आहे. या पध्दतीने मत्स्यपालन करताना काही गैरसोय होत असली, तरी अनेकजण या पद्धतीने मत्स्यपालन यशस्वीपणे करून कमी खर्चात अधिक नफा कमावत आहेत.  यासाठी शासनाकडून प्रोत्साहनही दिले जात आहे.   बायोफ्लॉक टाक्या बनवण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभाग अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्य देखील प्रदान करतो. बिहार मधील मधेपुरा जिल्ह्यातील   गिड्डा गावातील सेवानिवृत्त सैनिक गगन प्रकाश हे देखील याच पद्धतीने मत्स्यपालन करून कमी खर्चात अधिक नफा कमावत आहेत.

    News18लोकमत
    News18लोकमत

    कशी झाली झाली सुरुवात? गगन प्रकाश सांगतात की निवृत्त होण्यापूर्वी छत्तीसगडला गेलो होतो. तिथे मी  बायोफ्लॉक पद्धतीने मासे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून या पद्धतीचा खर्च आणि नफा याची माहिती घेतली.  यानंतर मला वाटले की या पद्धतीने मासे पालन करून अधिक नफा मिळवता येतो. मत्स्यपालन हा असा व्यवसाय आहे, ज्यामध्ये इतर व्यवसायांच्या तुलनेत जोखीम कमी असते.   यानंतर गगन यांनी घरी येऊन मत्स्य विभागाशी संपर्क साधला. माहिती गोळा केली आणि मत्स्यपालन सुरे केले.    तीन कुंड्यांमध्ये 7 बायोफ्लॉक टाक्या आणि 7 तलाव बनवले. यामध्ये विविध जातीच्या माशांचे संगोपन मी करत आहे. यासोबतच मी देशी कुक्कुटपालनही सुरू केले आहे. लोक सहसा या पद्धतीला फ्लॉप म्हणतात पण सत्य हे आहे की योग्य तंत्राने मत्स्यपालन न केल्यामुळे असे घडते. तांत्रिक ज्ञानासह योग्य काळजी घेतल्यास तुम्ही चांगला नफा कमवू शकता, असं गगन सांगतात.

    पपई ठरतेय वरदान! तरुण शेतकऱ्याने केली कमाल महिन्याला कमावतो 1.25 लाख

    वर्षातून दोनदा वेळा विकले जातात मासे  बायो फ्लॉक्सच्या टाकीत मी मत्स्यबीज तयार करतो. मग ते बाहेर काढून तलावात टाकून मत्स्यपालन केले जाते. 4 ते 5 महिन्यांत एक मासा 500 ते 700 ग्रॅम होतो. या आकाराच्या माशांनाही बाजारात मागणी आहे. मोठे मासे विकायचे असतील तर आणखी दिवस लागतील. परंतु 4 ते 5 महिन्यांत मासे विकले गेले तर ही प्रक्रिया वर्षातून दोनदा होते. बाजारात मासळीला खूप मागणी असल्याने विक्रीत कोणतीही अडचण नसल्याचे त्यांनी सांगितले.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात