कर्नाल, 22 जुलै : गव्हाच्या नवीन जातींच्या तांत्रिक विकासासाठी कर्नाल येथील भारतीय गहू आणि जव संशोधन संस्थेला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. नवी दिल्ली येथे केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्ते संस्थेचे डॉ. ज्ञानेंद्र सिंह यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच बीज वितरणसाठी सीड पोर्टलचेही अनावरण करण्यात आले. आता डीबीडब्ल्यू 327 चे नवीन वाण शेतकऱ्यांचे नशीब बदलेल आणि 80 क्विंटल प्रति हेक्टरपर्यंत उत्पादन होईल, असे सांगण्यात आले आहे. संस्थेचे संचालक डॉ. ज्ञानेंद्र सिंह यांनी सांगितले की, त्यांनी गव्हाच्या डीबीडब्ल्यू 327 जातीला विकसित केले आहे, हे वाण विज्ञान तंत्राच्या वर्गात सर्वोत्तम आहे. यामध्ये पिकांवर आजार पडण्याची शक्यता नाही आहे तसेच याचे उत्पादन 80 क्विंटल प्रति हेक्टर आहे. याप्रसंगी केंद्रीय मंत्र्यांनी संस्थेने विकसित केलेले सीड पोर्टलचेही उद्घाटन केले. या पोर्टलच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षांमध्ये 40 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना ऑनलाइनच्या माध्यमातून वाण दिले जात आहे.
तसेच ते म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यांना पोर्टलच्या माध्यमातून डीबीडब्ल्यू 327 गव्हाच्या या जातीचे बीज देतो आणि एक शेतकऱ्याला जवळपास 10 किलो बीज मिळते, जे शेतकरी आपल्या शेतात 0.25 एकरमध्ये लावू शकतो. या माध्यमातून शेतकरी आपल्या शेतातून जवळपास 7 ते 8 क्विंटल गहू उत्पन्न घेऊ शकतो. गव्हाचे हे वाण अधिकतर पंजाब, राजस्थान, हरियाणा, पश्चिमी उत्तरप्रदेश , दिल्लीच्या भूमीसाठी उपयुक्त आहे. गेल्या वेळी जवळपास 8 हजार शेतकऱ्यांना हे वाण देण्यात आले होते.
तसेच ज्या खासगी बियाणे परवाना आधारित कंपन्या आहेत, त्यांनाही हे वाण दिले जाते. तिथूनही शेतकरी ते घेऊ शकतात आणि गव्हाचे उत्पादन वाढवू शकतात. तसेच मध्य भारत आणि आसपासच्या राज्यांसाठी दुसरे बीज आहेत, ज्यांच्या प्रयोग करण्यात आला असून त्यांचा प्रतिसादही चांगला मिळाला आहे. त्या वाणात जवळपास 1 हेक्टरमध्ये 80 क्विंटल गहू पिकतो. त्या वाणाची जात डीबीडब्लयू 187, डीबीडब्ल्यू 303 ही आहे. सामान्य गव्हाच्या वाणाच्या माध्यमातून 50 ते 55 किलो प्रतिहेक्टर गहू पिकतो. मात्र, भारतीय गहू आणि जव संशोधन संस्थेने तयार केलेल्या या वाणाच्या माध्यमातून एका हेक्टरमध्ये 80 क्विंटल गव्हाचे पिक घेता येऊ शकते. वातावरणाचाही या वाणावर कोणताच फरक पडत नाही. दरम्यान, आता Https://iiwbr.icar.gov.in/seed-portal/# हे पोर्टल सप्टेंबर महिन्यात उघडणार आहे. या पोर्टलवर अर्ज केल्यावर शेतकरी येथून गव्हाचे वाण घेऊन जाऊ शकतात.