जाहिरात
मराठी बातम्या / मनी / या शेतकऱ्यानं पिकवला 500 रुपये किलोचा तांदूळ, तज्ञ म्हणतात, कॅन्सर अन् शुगरच्या रुग्णांसाठी रामबाण उपाय

या शेतकऱ्यानं पिकवला 500 रुपये किलोचा तांदूळ, तज्ञ म्हणतात, कॅन्सर अन् शुगरच्या रुग्णांसाठी रामबाण उपाय

हिरवा तांदूळ

हिरवा तांदूळ

तज्ज्ञांच्या मते, हा भात कर्करोग आणि साखरेच्या रुग्णांसाठी रामबाण उपाय आहे.

  • -MIN READ Local18 Bihar
  • Last Updated :

नकुल कुमार, प्रतिनिधी पूर्वी चंपारण, 7 जुलै : सध्या शेतकरी आपल्या शेतात विविध प्रयोग करत आहेत. त्यामाध्यमातून चांगला नफाही मिळवत आहे. आधुनिक शेतीच्या जोरावरही शेतकरी काही ठिकाणी आर्थिकदृष्ट्या विकास करताना दिसत आहे. असेच एक शेतकरी म्हणजे, प्रयागदेव सिंह. बिहारच्या पूर्वी चंपारण जिल्ह्यातील सागर चुरामन गावातील रहिवासी प्रयागदेव सिंह गेल्या तीन वर्षांपासून वेगवेगळ्या राज्यांमध्ये भाताची विविधता वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रयोगादरम्यान त्यांनी हिरव्या भाताची लागवड सुरू केली आहे. शेतकरी प्रयाग देवसिंग सांगतात की, हिरवा तांदूळ हा बासमतीप्रमाणेच सुवासिक तांदूळ आहे. चंपारणच्या मातीत त्याची चव आणखी वाढते.

News18लोकमत
News18लोकमत

हिरवा तांदूळ हा हार्ट आणि शुगरच्या रुग्णांसाठी रामबाण उपाय आहे. त्यामुळे हिरवा तांदूळ हा फक्त तांदूळ नसून एक औषध आहे. म्हणूनच त्याचा बाजारभाव खूप जास्त आहे. साधारणपणे 500 रुपये प्रति किलो दराने तो उपलब्ध आहे, असेही त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, ते एकदा यूट्यूब पाहत होते. यावेळी त्यांना या तांदळाची माहिती मिळाली. यानंतर रायपूर येथील त्यांच्या नातेवाईकाच्या माध्यमातून 100 ग्रॅम तांदळाच्या बिया त्यांनी मागवल्या. हा भात खूपच चवदार असल्याचे शेतकरी सांगतात. खाल्ल्यानंतर स्तुती केल्याशिवाय कोणीही राहू शकत नाही. तज्ज्ञांच्या मते, हा भात कर्करोग आणि साखरेच्या रुग्णांसाठी रामबाण उपाय आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: bihar , farmer , Local18
  • First Published :
जाहिरात
जाहिरात