मुंबई, 16 ऑक्टोबर: दिवाळीपूर्वी केंद्रीय अर्थ मंत्रालयानं सार्वजनिक क्षेत्रातील चार सामान्य विमा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना भेट दिली आहे. अर्थ मंत्रालयानं चार सरकारी विमा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात सुमारे 12 टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. कर्मचाऱ्यांना वाढवलेला पगार ऑगस्ट 2017 पासून लागू होणार आहे. 2017 पासून चारही विमा कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही सरकार पाच वर्षांची थकबाकी देणार आहे. 14 ऑक्टोबर 2022 रोजीच्या राजपत्रातील अधिसूचनेत म्हटले आहे- ‘या योजनेला सामान्य विमा (अधिकारी आणि इतर सेवा शर्तींसह) सुधारणा योजना 2022 म्हटले जाऊ शकते. त्यानुसार, ऑगस्ट 2022 च्या देय वेतनाची सुधारणा कंपनी आणि कर्मचार्यांच्या कामगिरीवर अवलंबून बदलत्या पगाराच्या स्वरूपात असेल. पगारातील ही वाढ ऑगस्ट 2017 पासून लागू आहे आणि त्या वेळी या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाच वर्षांची थकबाकी दिली जाईल, असं सरकारनं सांगितलं. सध्या चार सरकारी कंपन्या सामान्य विमा क्षेत्रात आहेत. यामध्ये न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांचा समावेश आहे. हेही वाचा: PM Kisan: प्रतीक्षा संपली! उद्या शेतकऱ्यांना मिळणार 12व्या हप्त्याचे 2000 रुपये, सोबतच मिळणार खास भेट पाच वर्षांचा विलंब- सरकारी बँका आणि विमा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात दर पाच वर्षांनी सुधारणा केली जाते. सध्या सामान्य विमा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात बदल करण्यात आला आहे. मात्र, त्याला पाच वर्षे उशीर झाला आहे. त्यांची पुढील वेतन सुधारणा देखील ऑगस्ट 2022 मध्ये होणार आहे. सरकारने महागाई भत्ता वाढवला आहे- केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ केली होती. सरकारने कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये चार टक्क्यांनी वाढ केली होती. आता सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए 38 टक्के झाला आहे. डीए हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक पगाराचा भाग आहे. या वाढीव डीएचा लाभ 1 जुलै 2022 पासून कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. तथापि, केंद्रीय कर्मचाऱ्यांची जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंतची डीए थकबाकी प्रलंबित आहे. देशात कोविड-19 महामारीच्या उद्रेकादरम्यान सरकारने कर्मचाऱ्यांचा डीए 18 महिन्यांसाठी थांबवला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.