Home /News /money /

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, 18 महिन्यांची डीए थकबाकी एकरकमी मिळण्याची शक्यता

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, 18 महिन्यांची डीए थकबाकी एकरकमी मिळण्याची शक्यता

केंद्र सरकारनं 18 महिन्यांचा थकित डीए दिल्यास अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्या (Government Employees) खात्यात दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा होऊ शकते.

नवी दिल्ली, 7 मार्च : राज्य सरकार (State Government) आणि केंद्र सरकारच्या (Central Government) विविध खात्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वेतन आयोगांची (Pay Commissions) तरतूद करण्यात आलेली आहे. वेळोवेळी शासन या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार पगारवाढीचं धोरण लागू करत असतं. काही वर्षांपूर्वी देशात सातवा वेतन आयोग (7th Pay Commission) लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलेला आहे. सुरुवातीला केंद्र सरकारचे कर्मचारी आणि नंतर राज्य सरकारचे कर्मचारी अशा दोन टप्प्यांमध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मात्र, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना गेल्या 18 महिन्यांचा महागाई भत्ता मिळालेला नाही. याबाबत केंद्र सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार, आपल्या कर्मचाऱ्यांचा 18 महिन्यांचा थकित डीए (DA) लवकरच देणार असल्याचं म्हटलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महागाई भत्त्याच्या (DA Arrears) थकबाकीबाबत लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो. जर केंद्र सरकारनं 18 महिन्यांचा थकित डीए एकत्र दिला तर अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा होऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाच राज्यांतील निवडणुका संपल्यानंतर आणि होळीपूर्वी सरकार कर्मचाऱ्यांना ही भेट देऊ शकतं. गेल्या काही काळापासून केंद्रीय कर्मचारी जानेवारी 2020 ते जून 2021 (18 महिने) या काळातील डीएची सतत मागणी करत आहेत. नॅशनल काउन्सिल ऑफ जेसीएमचे (JCM) सचिव (स्टाफ साइड) शिव गोपाल मिश्रा (Shiv Gopal Mishra) यांच्या म्हणण्यानुसार, कार्मिक व प्रशिक्षण विभाग (DoPT) आणि वित्त मंत्रालयातील खर्च विभागातील अधिकार्‍यांसोबत जेसीएमची एक संयुक्त बैठक (Joint Meeting) लवकरच होणार आहे. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या डीए थकबाकीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या काळात सरकार डीए थकबाकीबाबत काही मोठे अपडेट देऊ शकतं. बँक खात्यात येतील दोन लाख रुपये केंद्र सरकारनं 18 महिन्यांचा थकित डीए दिल्यास अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्या (Government Employees) खात्यात दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा होऊ शकते. लेव्हल-1 कर्मचाऱ्यांची डीए थकबाकी 11 हजार 880 ते 37 हजार रुपये इतकी असेल. तर, लेव्हल-13 कर्मचाऱ्यांना एक लाख 44 हजार 200 ते दोन लाख 18 हजार 200 रुपये डीए थकबाकी म्हणून मिळतील. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना (Pensioners) डीए दिला जातो. कर्मचार्‍यांना त्यांच्या राहणीमानाच्या खर्चात मदत करण्यासाठी डीए दिला जातो. डीएबाबतची माहिती समोर आल्यानंतर आता सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचं जेसीएमच्या संयुक्त बैठकीकडे लक्ष लागलं आहे. या बैठकीतील निर्णयाचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणार आहे.
First published:

Tags: Central government, Government employees

पुढील बातम्या