मुंबई : बहुप्रतिक्षीत 5G शनिवारी १ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाँच होणार आहे. टेलिकॉम कंपन्यांचे स्टॉल लावले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. टेलिकॉम सेक्टर्समधील स्टार्टअप्स समजून घेणार आहेत. त्यानंतर 5G सेवेचं डेमोंस्टेशन करण्यात येईल. एअरटेल कंपनी वाराणसीचा डेमो देणार आहे. वोडाफोन आयडिया दिल्लीतील डेमो देतील. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी 5G बाबात घोषणा करतील. यासोबत 6G बाबात देखील पंतप्रधान मोदी बोलण्याची शक्यता आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 5G नवीन आर्थिक संधी आणि सामाजिक खूप मोठा फायदा मिळवून देऊ शकते. परिवर्तन घडवून आणू शकते. स्टार्टअप्स आणि व्यावसायिक उपक्रमांद्वारे नवनिर्मितीला चालना देण्यासाठी तसेच ‘डिजिटल इंडिया’ची दृष्टी पुढे नेण्यास मदत करेल. भारतावर 5G चा आर्थिक प्रभाव 2035 पर्यंत 450 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
A slew of important cues to track - September Auto Sales, eye on the all important 5G launch in India and a peak into the gas stocks ahead of expected price hikes. @_soniashenoy @Reematendulkar & @sonalbhutra with a comprehensive picture of what can be expected pic.twitter.com/FE8rsJ54Tq
— CNBC-TV18 (@CNBCTV18News) September 30, 2022
2030 पर्यंत 2G आणि 3G नावापुरते उतील. तसेही आता 3G आणि 4G शिवाय इतर नेट सर्व्हिस फार कोणी वापरत नाहीत.
एक तृतीयांश मोबाईल कनेक्शन 5G वापरणारे असणार आहेत. या सेवेमुळे 5G मोबाईल खरेदी करण्याकडे तरुणांचा कल अधिक असल्याचं दिसत आहे. न्यूज १८ लोकमतवर तुम्हाला हा उद्घाटनाचा सुवर्णक्षण पाहता येणार आहे.