मुंबई, 1 नोव्हेंबर: फेडरल बँकेनं ग्राहकांसाठी नवीन प्रकारचं क्रेडिट कार्ड लाँच केलं आहे. ग्रुप क्रेडिट शील्ड असे या कार्डचे नाव असून यामध्ये अनेक प्रकारच्या सुविधा एकाच वेळी उपलब्ध आहेत. सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे मोफत जीवन विमा. हे क्रेडिट कार्ड घेणाऱ्या व्यक्तीला 3 लाख रुपयांचं मोफत जीवन विमा संरक्षण मिळेल. म्हणजेच कार्डधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या नॉमिनीला कव्हर म्हणून 3 लाख रुपये मिळतील. आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे या कार्डवर ग्राहकाला 3 लाख रुपयांपर्यंतची क्रेडिट लिमिट मिळत आहे. फेडरल बँकेनं या क्रेडिट कार्डसाठी एजिस फेडरल लाइफ इन्शुरन्सशी करार केला आहे. फेडरल बँकेनं एका निवेदनात म्हटलं आहे की, ग्रुप क्रेडिट शील्ड क्रेडिट कार्ड आपल्या ग्राहकांना विशेष कव्हर ऑफर करते. यामध्ये क्रेडिट मर्यादेएवढेच विमा संरक्षण उपलब्ध आहे. या कार्डची क्रेडिट मर्यादा कमाल 3 लाख रुपये आहे. त्यानुसार कार्डधारकांना तीन लाख रुपयांचा जीवन विमा मोफत मिळत आहे. जीवन विम्याची मुदत 1 वर्ष आहे. हेही वाचा: Bank Loan: वाटोळं! या तीन बँकांचं कर्ज झालं महाग, EMI आणि व्याजदरही वाढला, ग्राहकांना फटका क्रेडिट कार्ड वैशिष्ट्ये-
- या क्रेडिट कार्डच्या इतर वैशिष्ट्यांमध्ये कोणत्याही कागदपत्रांशिवाय किंवा वैद्यकीय तपासणीशिवाय सुविधा समाविष्ट आहे. याचा अर्थ असा की हे क्रेडिट कार्ड घेण्यासाठी आणि त्यावर उपलब्ध असलेले जीवन विमा संरक्षण घेण्यासाठी तुम्हाला कोणतेही कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही. ही एक सिंगल प्रीमियम योजना आहे. ज्यांना सुविधांसह सेवा सुलभ हवी आहे, अशा ग्राहकांसाठी सर्वोत्तम आहे. फेडरल बँकेच्या म्हणण्यानुसार, क्रेडिट कार्डची ही विशेष सेवा पूर्ण सुरक्षेसह प्रदान केली जात आहे.
- ग्रुप क्रेडिट शील्ड योजनेचा लाभ फक्त 3 सेकंदात घेता येतो. यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोन किंवा कॉम्प्युटरवर सोपी प्रोसेस करावी लागेल.
- फेडरल बँक सध्या तीन क्रेडिट कार्ड प्रकार ऑफर करते ज्यात सेलेस्टा, इम्पेरियो आणि सिग्नेट यांचा समावेश आहे.
- ही तीन कार्ड अनुक्रमे Visa, MasterCard आणि RuPay नेटवर्कवर ऑपरेट केली जातात. फेडरल बँकेनं म्हटलं आहे की, ग्राहकांना या कार्डवर खर्च करण्याच्या स्वातंत्र्यासह लाइफ कव्हर सुरक्षा दिली जात आहे.
- क्रेडिट कार्डधारकाचा अकाली मृत्यू झाल्यास, कुटुंबातील सदस्य कर्जाची रक्कम परत करण्याची गरज भासणार नाही, कारण 3 लाख रुपयांचे जीवन विमा संरक्षण दिले जात आहे.
- फेडरल बँकेला विश्वास आहे की ग्रुप क्रेडिट शील्ड कार्डच्या मदतीने ते आपला ग्राहक वाढवण्यास मदत करेल.