
म्यूचुअल फंड गुंतवणूकीसाठी चांगला पर्याय मानला जातो. म्यूचुअल फंडद्वारे केवळ तुमच्याच नावे नाही, तर तुमच्या मुलांच्या नावेही गुंतवणूक करू शकता. योग्यरित्या सेव्हिंग केल्यास, मुलं 18 वर्षांची होईपर्यंत त्यांच्या नावे चांगली-मोठी रक्कम जमा होईल.

मुलांसाठी त्यांच्या सिंगल नावानेच म्यूचुअल फंडमध्ये गुंतवणूक सुरू करता येते. अशा गुंतवणूकीसाठी पालकांच्या नावाची गरज असते. मुलांच्या नावे म्यूचुअल फंड काढण्यासाठी बर्थ सर्टिफिकेट असणं आवश्यक असतं. मुलांचा पासपोर्ट असल्यास तोही मान्य असतो. त्यासोबतच आई-वडिलांचेही कागदपत्र द्यावे लागतात.

सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान (SIP): म्यूचुअल फंड सध्या सर्वात चर्चेत असणारी गुंतवणूक आहे. मुलांच्या नावे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लानमध्येही पैसे लावणं फायदेशीर ठरू शकतं. मुलाचं वय 18 वर्ष झाल्यानंतर यातील प्लानमध्ये गुंतवणूक केली जाऊ शकत नाही. मुलाच्या 18 वर्षानंतर एका प्रक्रियेद्वारे संपूर्ण पैसे मुलांच्या नावे होतील.

18व्या वर्षात मुलांच्या नावे मोठी रक्कम: 18 वर्षापर्यंत मुलांच्या नावे चांगली रक्कम जमा होण्यासाठी, मुलाच्या जन्मानंतर, त्याच्या नावे 5000 रुपयांपासून गुंतवणूक करावी लागेल. या गुंतवणूकीमध्ये दरवर्षी 15 टक्के वाढ करावी. या गुंतवणूकीवर दरवर्षी 12 टक्के रिटर्न मिळाले, तर मुलांच्या 18व्या वर्षापर्यंत मोठी रक्कम जमा असेल.




