30 सप्टेंबर : एनडीए सरकाराचा पाठिंबा काढणे सोप नाही, एनडीएच्या आधारावर सर्वांना मतं मिळाली आहेत जर उद्या पाठिंबा काढला तर पुन्हा निवडणुका घ्यावा लागतील असं स्पष्टीकरण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. एकाप्रकारे एनडीए सरकारमधून बाहेर न पडण्याचे संकेतच आता उद्धव यांनी दिले.
गेल्या 25 वर्षांची युती जागावाटपावरून तुटली. त्यानंतर शिवसेनेनं मोदी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. एवढेच नाहीतर
पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतल्यानंतर केंद्रीय अवजड उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते अनंत गीते आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देतील. असंही उद्धव ठाकरे यांनी सोमवारी स्पष्ट केलं होतं. पण आज शिवसेनेनं एनडीएमधून बाहेर न पडण्याचे संकेत दिले आहे. मातोश्रीवर आज रिपाइंचे नेते अर्जुन डांगळे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना शिवसेना मोदी सरकारमधून बाहेर पडणार का ? असा प्रश्न पुन्हा विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले की, एनडीए सरकारमधून बाहेर पडणं सोप नाही. एनडीएच्या आधारावर सर्वांना मतं मिळाली आहेत. पाठिंबा काढला तर पुन्हा निवडणुका घ्यावा लागतील आणि त्यावेळी जनतेचा काय कौल होता आणि आता काय मिळेल याबद्दल साशकंता आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी अनंत गीते राजीनामा देतील आणि शिवसेना केंद्र सरकारमधून बाहेर पडेल असं स्पष्ट केलं होतं. अनंत गीतेंनी ही उद्धव यांचा निर्णय मान्य असल्याचं स्पष्ट केला होता. आता मात्र उद्धव यांनी शिवसेना एनडीएमधून बाहेर पडणार नसल्याचे संकेत दिले आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: NDA, Shiv sena, Udhav thakarey