26 सप्टेंबर : शिवसेनेशी घटस्फोट घेतल्यानंतर भाजपने आपली पहिली 172 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत विद्यमान सर्व आमदारांनी तिकीट देण्यात आलं आहे.
त्यामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे आणि सुधीर मुनगंटीवारांसारख्या महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश आहे. तर दक्षिण कराडमधून काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यांच्या विरोधात अतुल भोसले यांना रिंगणात उतरवण्यात आलंय.
त्याचप्रमाणे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेले डॉ. विजयकुमार गावित यांना नंदुरबारमधून, श्रीगोंदामधून बबनराव पाचपुते, मनसेला सोडचिठ्ठी देऊन आलेल्या राम कदम यांना घाटकोपरमधून आणि मंदा म्हात्रे अशा नेत्यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
मंदा म्हात्रे यांना बेलापुरातून तर पनवेलमधून प्रशांत ठाकूरांना उमेदवारी मिळाली आहे. सिंदखेड्यात जयकुमार रावल, धुळ्यातून अनिल गोटे, गुहागरमधून विनय नातू यांना उमेदवारी मिळाली आहे.
भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MNS, Ram kadam, Vijaykumar gavit