जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Palghar Zika Virus : वर्षभराने पुन्हा राज्यावर झिकाचं संकट; 7 वर्षांच्या चिमुकलीला व्हायरसची लागण

Maharashtra Palghar Zika Virus : वर्षभराने पुन्हा राज्यावर झिकाचं संकट; 7 वर्षांच्या चिमुकलीला व्हायरसची लागण

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

गेल्या वर्षी पुण्यात झिकाचा रुग्ण सापडला होता. त्यानंतर आता पालघरमध्ये झिकाचं प्रकरण आढळलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पालघर, 13 जुलै :  महाराष्ट्रात कोरोनाची प्रकरणं दिवसेंदिवस वाढत आहेत. नवनवे व्हेरिंएंट्स समोर येत आहेत. हे कमी की काय त्यात आता झिका व्हायरसचं संकट पुन्हा ओढावलं आहे. वर्षभरानंतर राज्यात झिका व्हायरसचं प्रकरण आढळून आलं आहे. पालघरमध्ये झिका व्हायरसचा रुग्ण सापडला आहे. त्यामुळे आता चिंता अधिक वाढली आहे (Maharashtra Palghar Zika Virus). पालघर जिल्ह्यातील 7 वर्षांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण झाल्याचं निदान झालं आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार झाई येथील आश्रमशाळेतील ही मुलगी आहे.  राज्यातील वर्षभरानंतर आढळलेलं हे दुसरं प्रकरण आहे. याआधी गेल्या वर्षी पुण्यात झिकाचा रुग्ण सापडला होता. जुलै 2021 मध्ये झिकाचा पहिला रुग्ण आढळला होता. पुरंदर तालुक्यातील बेलसरमधील 50 वर्षीय महिलेला झिका व्हायरसची लागण झाली आहे. बरोबर वर्षभरानंतर आता झिकाचा दुसरा रुग्ण सापडला आहे.

जाहिरात

झिका व्हायरस हा डेंग्यू पसरवणाऱ्या एडिस जातीच्या डासांमुळेच पसरतो. साठलेल्या पाण्यात त्यांचं प्रजनन होतं आणि हे डास घरात राहण्याचं प्रमाण अधिक असतं. हे वाचा -  Pani Puri Causes Typhoid : सावधान! कोरोनाच्या संकटात पसरतोय ‘पाणीपुरी आजार’; आरोग्य विभागाने केलं Alert झिका विषाणूमुळे जन्मजात दोष उद्भवतात. गिलेन बॅरे सिंड्रोमही होऊ शकतो. गर्भवती महिलांना संसर्ग झाल्यास तिच्या बाळामध्ये व्यंगही येऊ शकतं. झिकाची लक्षणं कोरोना संसर्गाप्रमाणेच झिकाचा संसर्ग झालेल्या अनेकांना कोणतंच लक्षण दिसत नाही. काही जणांना सौम्य लक्षणं दिसतात. त्यात डोकेदुखी, ताप, सांधेदुखी, स्नायूदुखी, डोळे लाल होणं, त्वचेवर रॅशेस येणं आदी लक्षणांचा समावेश आहे. ही लक्षणं दोन ते सात दिवसांपर्यंत दिसू शकतात. अनेकांना लक्षणं दिसत नसल्याने किंवा सौम्य असल्याने संसर्ग झालाय हेच कळत नाही. हे वाचा -  बापरे! मेंदू कुरतडून कुरतडून घेतो जीव; व्यक्तीच्या डोक्यात घुसला Brain Eating Amoeba झिका विषाणूवर अद्याप औषध नाही; मात्र इनअॅक्टिव्हेटेड व्हॅक्सिन (Inactivated Vaccine) विकसित करण्याचे आदेश जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिले आहेत. मार्च 2016पासून जगभरातल्या 18 औषध कंपन्या या लसनिर्मितीचं संशोधन करत आहेत. यासाठी 10 वर्षं लागू शकतात, असं त्यांचं म्हणणं आहे. काही लशींच्या चाचण्या झाल्या असल्या, तरी अद्याप कोणत्याच लशीला मंजुरी नाही आणि उत्पादनही सुरू झालेलं नाही. त्यामुळे हा संसर्ग अधिक धोकादायक आहे. सर्वात आधी कधी आढळला होता झिका? झिका व्हायरस पहिल्यांदा एप्रिल 1947मध्ये युगांडातल्या झिका जंगलांत राहणाऱ्या रीसस मकाउ माकडांत आढळला. 1950पर्यंत तो केवळ आफ्रिका, आशियाच्या विषुववृत्तीय प्रदेशातच होता. 2007 ते 2016 या कालावधीत तो प्रशांत महासागराच्या प्रदेशात आणि अमेरिकेत पसरला,. 2015-16मध्ये अमेरिकेने त्याला महासाथ घोषित केलं होतं. भारतात झिका विषाणूची लागण झाल्याच्या केसेस सर्वांत पहिल्यांदा 1952-53 मध्ये आढळल्या होत्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात